अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा

By उद्धव गोडसे | Published: May 16, 2023 04:45 PM2023-05-16T16:45:20+5:302023-05-16T16:45:54+5:30

२०१७ मध्ये घडला होता गुन्हा

Rape of minor girl in kolhapur: Accused sentenced to 10 years hard labor and Rs 30,000 fine | अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ओळख वाढवून अल्पवयीन मुलीस घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी गौरव सतीश कांबळे (वय २७, रा. पोस्ट ऑफिसजवळ, रमणमळा, कोल्हापूर) याला १० वर्षे सक्त मजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी मंगळवारी (दि. १६) झालेल्या सुनावणीत शिक्षा सुनावली. हा गुन्हा फेब्रुवारी ते मार्च २०१७ मध्ये घडला होता.

सरकारी वकील अस्मिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरव कांबळे याने फेब्रुवारी ते मार्च २०१७ मध्ये पीडित अल्पवयीन मुलीस घरी बोलवून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार घरात कोणाला सांगितल्यास आई, वडील आणि भावास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. पीडित मुलगी साडेतीन महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडितेच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक टी. जी. देशमुख यांनी तपास करून कांबळे याच्यावर आरोपपत्र दाखल केले.

ॲड. कुलकर्णी यांनी कोर्टात आठ साक्षी तपासल्या. पीडित मुलगी, तिची आई यासह अन्य साक्षी, तसेच सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तिडके यांनी आरोपीस दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात दहा वर्ष सक्तमजुरी आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून सुरेश परीट आणि माधवी संजय घोडके यांनी काम पाहिले.

Web Title: Rape of minor girl in kolhapur: Accused sentenced to 10 years hard labor and Rs 30,000 fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.