आजरा बाजारपेठेतील गर्दीला रोखण्यासाठी रॅपिड अँटिजेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:19 AM2021-05-29T04:19:11+5:302021-05-29T04:19:11+5:30

आजरा : बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची आज कोरोना अँटिजेन टेस्ट करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व बाजारपेठेतील गर्दीला रोखण्यासाठी ...

Rapid antigen to prevent congestion in Ajra market | आजरा बाजारपेठेतील गर्दीला रोखण्यासाठी रॅपिड अँटिजेन

आजरा बाजारपेठेतील गर्दीला रोखण्यासाठी रॅपिड अँटिजेन

Next

आजरा

: बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची आज कोरोना अँटिजेन टेस्ट करण्यात आली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व बाजारपेठेतील गर्दीला रोखण्यासाठी आजरा नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने अचानक तपासणी केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आज घेतलेल्या ४३ जणांच्या स्वॅबपैकी १ जण कोरोनाबाधित आढळला.

लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा दुकान, भाजीपाला व शेतीपयोगी दुकाने सुरू असतात. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली आहे.

सकाळी ११ नंतरही अनेक जण बाजारपेठेत विनाकारण फिरत असतात. अनेक जणांच्या तोंडाला मास्क ही नसतो. मास्क नाही व सामाजिक अंतर न ठेणाऱ्यांवर नगरपंचायत व पोलीस प्रशासनाच्या स्वतंत्र पथकामार्फत कारवाई सुरू आहेच. मात्र त्यालाही अनेक जण वाटाण्याच्या अक्षता दाखवत मोकाट फिरत असतात. त्यासाठी आजपासून धडक मोहीम सुरू केली आहे. बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांना वचक बसावा यासाठी त्यांची कोरोना रॅपिड अँटिजेन टेस्ट घेतली जात आहे. त्यामध्ये कोरोनाबाधित आढळल्यास त्यांची रवानगी आजऱ्याच्या कोविड सेंटरमध्ये केली जात आहे.

आजऱ्यातील संभाजी चौकात आज रुग्णवाहिका आणून नगरपंचायतचे कर निरीक्षक विजय कुमार मुळीक व पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशाल कांबळे, सुनील मटकर, किशोर कांबळे,नंदू कांबळे, बाबुराव कांबळे यांच्या पथकाने विनाकारण फिरणाऱ्यांना पकडून आणले व त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट घेतली. आज ४३ जणांची टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये एकजण कोरोनाबाधित सापडला असून त्याला तातडीने आजरा कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. सदरची कारवाई यापुढे दररोज केली जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

फोटो कॅप्शन - आजऱ्यातील संभाजी चौकात विनाकरण बाजारपेठेत फिरणाऱ्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यासाठी लागलेली रांग.

Web Title: Rapid antigen to prevent congestion in Ajra market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.