इचलकरंजीत पथकाद्वारे १३० जणांची रॅपिड अॅँटिजन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:51+5:302021-05-20T04:26:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या भरारी पथकाने बुधवारी दिवसभरात शहरातील विविध भागांत कारवाई केली. यामध्ये विनामास्क, मॉर्निंग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या भरारी पथकाने बुधवारी दिवसभरात शहरातील विविध भागांत कारवाई केली. यामध्ये विनामास्क, मॉर्निंग वाॅक व विनाकारण फिरणाऱ्या तसेच औषध दुकानांतील १३० नागरिकांची रॅपिड अॅँटिजन चाचणी केली, यात चार नागरिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
प्रशासनाने वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे औषधे व आरोग्य सेवा वगळता सर्व आस्थापना व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक प्रशासनाच्या निर्णयाचे उल्लंघन करीत फिरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
बेजबाबदार नागरिकांवर वचक निर्माण व्हावा, यासाठी प्रशासनाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या ५७, विनाकारण फिरणारे ७ व २२ औषध दुकानांमधील ६६ अशा एकूण १३० जणांची रॅपिड अॅँटिजन चाचणी केली. या चाचणीत चार नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना प्रशासनाने विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.
चौकट
नगरपालिका महिन्याभराने पुन्हा सक्रिय
शहर व परिसरात नागरिकांचा विनाकारण वावर सुरू होता. प्रशासनाने आवाहन करूनदेखील नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत होते. त्यामुळे नगरपालिकेने २० एप्रिलला के. एल. मलाबादे चौक परिसरात रॅपिड अॅँटिजन चाचणी केली होती. त्यानंतर अनेक दिवस कारवाईमध्ये खंड पडला होता. मात्र, नगरपालिकेचे पथक महिन्याभराने पुन्हा सक्रिय होऊन त्याने कारवाई सुरू केली आहे.
फोटो ओळी
१९०५२०२१-आयसीएच-०७
इचलकरंजी नगरपालिकेने १३० जणांची रॅपिड अॅँटिजन चाचणी केली.