नेसरी येथे २७५ जणांची रॅपिड अँटिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:15+5:302021-06-22T04:18:15+5:30
नेसरी: कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नेसरी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन चाचणी शिबिरात २७५ जणांची कोविड १९ ची ...
नेसरी: कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत नेसरी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन चाचणी शिबिरात २७५ जणांची कोविड १९ ची चाचणी घेण्यात आली. चाचणी केलेल्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास घेतला.
आजच्या चाचणी शिबिरात नेसरी गावातील संशयित, बाधितांच्या संपर्कात असणारे, बाहेरगावी नोकरी किंवा कामानिमित्त जाणारे, भाजीपाला विक्रेते, मार्केटिंग एजंट, घरपोच सेवा देणारे कर्मचारी, व्यापारी आणि आस्थापनेत काम करणारे कर्मचारी अशा एकूण २७५ लोकांची चाचणी करण्यात आली.
कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २५० व ग्रामीण रुग्णालयातील २५ अँटिजेन असे एकूण २९५ किट वापरले गेले. यावेळी सरपंच आशिषकुमार साखरे, उपसरपंच अमर हिडदुग्गी, ग्रामविकास अधिकारी पी.बी. पाटील, तलाठी प्रशांत पाटील, आरोग्यसेवक नसीम मुजावर, आरोग्यसेवक सर्जेराव रणदिवे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. विक्रम गंधाडे, सौ. स्नेहलता सटाले यांच्यासह सोमनाथ तेली, अशोक पाटील, कृष्णा कांबळे, कोतवाल हरीश बुवा, व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.