हेल्मेट सक्तीविरोधात तीव्र आंदोलन

By Admin | Published: July 25, 2016 01:00 AM2016-07-25T01:00:38+5:302016-07-25T01:00:38+5:30

संघर्ष समितीचा निर्धार : पुढील आठवड्यात आंदोलनाची सुरुवात

Rapid movement against helmet forced | हेल्मेट सक्तीविरोधात तीव्र आंदोलन

हेल्मेट सक्तीविरोधात तीव्र आंदोलन

googlenewsNext

कोल्हापूर : राज्य सरकारने केलेली हेल्मेट सक्ती अन्यायकारक आहे. ही सक्ती रद्द करण्यासाठी कोल्हापुरात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार रविवारी हेल्मेटविरोधी संघर्ष समितीने केला. तसेच या आंदोलनाची सुरुवात पुढील आठवड्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी हेल्मेटविरोधी संघर्ष समितीची हिंदू एकताच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात समितीचे निमंत्रक जयकुमार शिंदे म्हणाले, हेल्मेट सक्ती जनतेवर अन्यायकारक आहे. सक्ती करणाऱ्या परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा निषेध करतो. हेल्मेटच्या सततच्या वापरामुळे मणक्यांचा त्रास होतो शिवाय ते नेहमी हाताळणे सोयीस्कर नाही. जिल्ह्यात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या प्रकारात चोरट्यांनी हेल्मेटचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. हेल्मेटच्या सक्तीमुळे असे गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे हेल्मेट सक्तीविरोधात संघर्ष समितीतर्फे टप्प्या-टप्प्याने तीव्र आंदोलन केले जाईल. त्याची सुरुवात पुढील आठवड्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन केली जाणार आहे. रामेश्वर पत्की म्हणाले, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, शाळा-महाविद्यालय, विविध शासकीय-खासगी कार्यालयांतील दुचाकीधारकांची रॅली, परिवहन कार्यालयासमोर हेल्मेट फोडो आंदोलन, स्वाक्षरी मोहीम, आदी टप्प्यांनी आंदोलन तीव्र केले जाईल. किसन कल्याणकर म्हणाले, या आंदोलनाअंतर्गत पहिल्या टप्प्यात हेल्मेट सक्तीविरोधातील दहा हजार पत्रकांचे वाटप केले जाईल. आंदोलनात विविध संघटनांना सहभागी करून व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. नितीन जोशी म्हणाले, हेल्मेट सक्ती करण्याऐवजी रस्त्यांची अवस्था सुधारणांसह वाहतुकीच्या नियम पालनाबाबत प्रबोधनाची मोहीम शासनाने राबवावी. बैठकीस माजी नगरसेवक मधुकर रामाणे, धोंडिराम चोपडे, बाबा महाडिक, चंद्रकांत हलके, विजय निकम, शीतल नलवडे, अमेय माने, सुरेश बट्टेवार, महेश सासने, फिरोजखान वस्ताद, सुभाष कोळी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rapid movement against helmet forced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.