महाविद्यालयांमध्ये पदवीचे वर्ग सुरू करण्याची वेगाने तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:23 AM2021-02-13T04:23:09+5:302021-02-13T04:23:09+5:30

वर्ग सुरू करण्याची सूचना विद्यापीठ प्रशासनाने ईमेलद्वारे महाविद्यालयांना गुरुवारी केल्या आहेत. त्यानुसार तयारी करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यापीठ ...

Rapid preparation to start degree classes in colleges | महाविद्यालयांमध्ये पदवीचे वर्ग सुरू करण्याची वेगाने तयारी

महाविद्यालयांमध्ये पदवीचे वर्ग सुरू करण्याची वेगाने तयारी

Next

वर्ग सुरू करण्याची सूचना विद्यापीठ प्रशासनाने ईमेलद्वारे महाविद्यालयांना गुरुवारी केल्या आहेत. त्यानुसार तयारी करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यापीठ संलग्नित बहुतांश महाविद्यालयांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. त्यानंतर वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता, हात धुण्यासह सॅनिटायझर स्टँड, थर्मल गनने तपासणी करण्याची व्यवस्था करण्याचे काम महाविद्यालयांमध्ये सुरू झाले. रविवारी सुटी असल्याने शनिवारी सर्व तयारी पूर्ण करण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे. महाविद्यालयांप्रमाणे विद्यापीठातील कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या अधिविभागांमध्ये वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे.

चौकट -

महाविद्यालयांना सूचना

विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांना विचार करून आमच्या समितीने वर्ग सुरू करण्याच्या शिफारस विद्यापीठ प्रशासनाला केली. त्यानुसार विद्यापीठाने अधिकार मंडळांची मान्यता घेऊन महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या विद्यापीठाच्या समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी शुक्रवारी दिली.

प्रतिक्रिया -

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याची तयारी आमच्या महाविद्यालयात सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेऊन वर्ग सुरू केले जातील.

- डॉ. राजेंद्र लोखंडे, प्राचार्य, महावीर महाविद्यालय

आकडेवारी दृष्टिक्षेप

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये : २९३

एकूण विद्यार्थी : २५६२४२

मुले : १२७४२८

मुली : १२१६६७

फोटो (१२०२२०२१-कोल-कॉलेज फोटो, ०१) : कोल्हापूर जिल्ह्यातील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सोमवारपासून भरणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर शहरातील श्री शहाजी महाविद्यालयात कर्मचाऱ्यांकडून शुक्रवारी वर्ग स्वच्छतेसह निर्जंतुकीकरणाचे काम सुरू होते. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Rapid preparation to start degree classes in colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.