पंचतारांकित वसाहतीत मॅकच्यावतीने रॅपिड टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:05+5:302021-04-24T04:25:05+5:30

कसबा सांगाव : मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले (मॅक) व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून मॅकमध्ये ...

Rapid test on behalf of Mack in a five-star colony | पंचतारांकित वसाहतीत मॅकच्यावतीने रॅपिड टेस्ट

पंचतारांकित वसाहतीत मॅकच्यावतीने रॅपिड टेस्ट

Next

कसबा सांगाव : मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल हातकणंगले (मॅक) व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून मॅकमध्ये पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक व कर्मचारी यांच्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट व व्हॅक्सिनेशन कॅम्प व शिवभोजन थाळीचा प्रारंभ करण्यात आला.

कॅम्पचे उद्घाटन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे व कार्यकारी अभियंता एस. डी. मोरे, उप अभियंता, बी. आर. प्रभावळकर, मॅकचे अध्यक्ष गोरख माळी, उपाध्यक्ष संजय पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आले. मॅकचे अध्यक्ष गोरख माळी यांनी त्यांनी कोविडच्या अनुषंगाने मॅकच्या वतीने कामगारांकरिता रॅपिड अँटिजेन टेस्ट, व्हॅक्सिनेशन कॅम्प व शिवभोजन थाळी उपक्रम आजपासून सुरू करीत असल्याचे सांगितले. संस्थेकडे सदर कॅम्पसाठी ३०० पेक्षा जास्त उद्योजक व कर्मचाऱ्यांची नोंद झालेली आहे.

कार्यकारी अभियंता एस. डी. मोरे यांनी मॅकने शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन त्वरित कॅम्पचे व शिवभोजन थाळीचे आयोजन कामगार व गरजू व्यक्तींसाठी केल्याबद्दल मॅकचे आभार मानले व हा मॅकने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे सांगितले.

कार्यक्रमास मॅकचे संचालक मोहन कुशिरे, संजय जोशी, विठ्ठल पाटील, अमृतराव यादव, निमंत्रित सदस्य भावेश पटेल, कुमार पाटील, सुरेश क्षीरसागर, मुबरक शेख, विशाल कामते, शिवाजी भोसले, डाॅ. मनीषा कुलकर्णी, डॉ. महादेव माने, उद्योजक, कामगार बंधू व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॅकचे सेक्रेटरी शंतनू गायकवाड यांनी केले. मॅक चे उपाध्यक्ष संजय पेंडसे यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------

फोटो कॅप्शन : पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल हातकणंगले येथे मॅकच्या वतीने कामगार, उद्योजक यांच्यासाठी रॅपिड ‌अँटिजेन टेस्ट व व्हॅक्सिनेशन कॅम्प व शिवभोजन थाळी प्रारंभ प्रसंगी औद्योगिक महामंडळाचे अधिकारी व मॅकचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Rapid test on behalf of Mack in a five-star colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.