शहरात आढळले दुर्मीळ घुबड, उपचारानंतर सोडले अधिवासात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:30 AM2021-07-07T04:30:34+5:302021-07-07T04:30:34+5:30

कोल्हापूर : पक्षीमित्र गणेश कदम यांना नेहमी घनदाट जंगलात आढळणारे दुर्मीळ कॉलर स्कॅप आउल अशक्त अवस्थेत कोल्हापूर शहरात आढळले. ...

Rare owls found in the city, left in the habitat after treatment | शहरात आढळले दुर्मीळ घुबड, उपचारानंतर सोडले अधिवासात

शहरात आढळले दुर्मीळ घुबड, उपचारानंतर सोडले अधिवासात

Next

कोल्हापूर : पक्षीमित्र गणेश कदम यांना नेहमी घनदाट जंगलात आढळणारे दुर्मीळ कॉलर स्कॅप आउल अशक्त अवस्थेत कोल्हापूर शहरात आढळले. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी उपचार केल्यानंतर या छोट्या घुबडाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी या संस्थेचे सदस्य गणेश कदम यांना हे दुर्मीळ कॉलर स्कॅप आउल (Collared Scope Owl ,शास्त्रीय नाव Otus letia) येथील जय भवानी कॉलनीतील अक्षय मोहन जगदाळे यांच्या घराजवळ अशक्त अवस्थेत सापडले. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांच्याकडे कदम यांनी हे घुबड उपचारासाठी नेले. वाळवेकर यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला खायला घातल्यानंतर त्याला दाट जंगलात सोडण्यात आले.

छोट्या आकाराचे दुर्मीळ घुबड

कोल्हापुरात आढळलेले हे भारतातील छोट्या आकाराचे घुबड असून याची लांबी २३ ते २५ सें.मी इतकीच असते. त्याचा चेहरा पिवळा असून त्यावर वर्तुळाकार पट्टा असतो. याचे डोळे गर्द तपकिरे आणि कानावर शिंगासारखी पिसे असतात. शरीरारावर राखाडी रंगाचे पट्टे असतात. शरीराचा खालचा भाग फिकट तपकिरी असून त्यावर बाणाच्या आकाराचे ठिपके असतात. पूर्णपणे निशाचर असलेले हे घुबड दिवसा झाडाच्या फांदीवर स्तबध बसून असते. कीटक, नाकतोडे, सरडे, उंदीर, पाल हे त्याचे अन्न असते. झाडाच्या डोलीमध्ये घरटे करतो. मादी ३ ते ४ अंडी घालते आणि नर व मादी दोघे मिळून पिलांचे संगोपन करतात.

-----------------------------------------------------------

(बातमीदार : संदीप आडनाईक)फोटो : 06072021-kol- collared scope owl

फोटो : 06072021-kol- collared scope owl 01

फोटो ओळी : पक्षीमित्र गणेश कदम यांना कोल्हापुरात आढळलेल्या दुर्मीळ घुबडावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

060721\06kol_4_06072021_5.jpg~060721\06kol_5_06072021_5.jpg

फोटो : 06072021-kol- collared scope owlफोटो ओळी : पक्षीमित्र गणेश कदम यांना कोल्हापूरात आढळलेल्या दुर्मिळ घुबडावर उपचार करुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.~फोटो : 06072021-kol- collared scope owl 01फोटो ओळी : पक्षीमित्र गणेश कदम यांना कोल्हापूरात आढळलेल्या दुर्मिळ घुबडावर उपचार करुन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Web Title: Rare owls found in the city, left in the habitat after treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.