कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:34 PM2020-06-25T16:34:54+5:302020-06-25T16:36:28+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. काल गगनबावडा तालुक्यात ३ मिमी व चंदगड तालुक्यात १ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Rare showers in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

googlenewsNext
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरीएक बंधारा पाण्याखाली, कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. काल गगनबावडा तालुक्यात ३ मिमी व चंदगड तालुक्यात १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, करवीर, कागल, गडहिंग्लज, भुदरगड व आजरा या तालुक्यात पाऊस झाला नाही. 

एक बंधारा पाण्याखाली, कोयनेतून २१६७ क्युसेक विसर्ग सुरू

जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६३.९१ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात ३३.१३ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ६०.७८० इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा

तुळशी ४२.६७ दलघमी, वारणा ३९९.३२ दलघमी, दूधगंगा २७४.५८ दलघमी, कासारी ३०.७६ दलघमी, कडवी २८.७० दलघमी, कुंभी ३१.५८ दलघमी, पाटगाव ३५.६८ दलघमी, चिकोत्रा १६.६८ दलघमी, चित्री १४.६६ दलघमी, जंगमहट्टी ८.५४ दलघमी, घटप्रभा ४३.९५ दलघमी, जांबरे १२.३६ दलघमी, कोदे (ल पा) ४.९४ दलघमी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे

राजाराम १३ फूट, सुर्वे १४.८ फूट, रुई ४१.६ फूट, इचलकरंजी ३७.६ फूट, तेरवाड ३६.३ फूट, शिरोळ २९.३ फूट, नृसिंहवाडी २२ फूट, राजापूर १२.९ फूट तर नजीकच्या सांगली ७ फूट व अंकली ६.७ फूट अशी आहे.

 

Web Title: Rare showers in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.