दुर्मीळ छायाचित्रांतून जीवनपट उलगडला

By admin | Published: October 2, 2015 01:04 AM2015-10-02T01:04:44+5:302015-10-02T01:14:29+5:30

प्रेक्षकांचा प्रतिसाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

Rarely photographed the life span | दुर्मीळ छायाचित्रांतून जीवनपट उलगडला

दुर्मीळ छायाचित्रांतून जीवनपट उलगडला

Next

कोल्हापूर : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आणि कोल्हापूरचा संबंध तसा जिव्हाळ्याचा. हा संबंध दर्शविणारा आणि विविध घटनांच्या दुर्मीळ छायाचित्रांचा पट गुरुवारी कोल्हापुरात पुन्हा एकदा उलगडला. निमित्त होते, दसरा चौकात राजर्षी शाहू स्मारक भवन येथे श्री छत्रपती शाहू महाराज स्वयंरोजगार संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मीळ छायाचित्रे व पत्रव्यवहाराच्या प्रदर्शनाचे.प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ़ आंबेडकरांना भेटलेली माणसे आणि त्यांच्या पत्रांच्या प्रदर्शनास नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती़ महाडच्या चवदार तळ्याच्या छायाचित्रापासून ते त्यांच्या जीवनात आलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रसंगांचे छायाचित्रण या प्रदर्शनात मांडलेले आहे़ या प्रदर्शनात १२५ दुर्मीळ छायाचित्रे व १०७ पत्रे आहेत.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रणजित सांगावकर व प्रा. शहाजी कांबळे यांनी मान्यवरांना प्रदर्शनातील माहिती दिली. हे प्रदर्शन ४ आॅक्टोबरपर्यंत खुले राहणार आहे. तरी याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी संयोजकानी केले. याप्रसंगी आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, विकी महाडिक, ‘सीपीआर’चे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, नीलेश हंकारे, संदीप पाटील, पृथ्वीराज कांबळे, राकेश कांबळे, सूरज कांबळे, संग्राम लिगडे, निशांत कांबळे, संदीप सांगावकर, दिलीप सांगावकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Rarely photographed the life span

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.