‘दक्षिण’च्या २० ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेचअमर पाटील ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:02 AM2017-09-18T01:02:29+5:302017-09-18T01:02:29+5:30

Rashikhai Amahar Patil for 20 South Panchayats. | ‘दक्षिण’च्या २० ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेचअमर पाटील ।

‘दक्षिण’च्या २० ग्रामपंचायतींसाठी रस्सीखेचअमर पाटील ।

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
दक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट ३६ गावांपैकी २० ग्रामपंचायतींची रणधुमाळी शिगेस पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकारणाची पहिली पायरी असणाºया ग्रामपंचायतींची सत्ता हाती ठेवल्यास २०१९ ची विधानसभा व लोकसभा सोपी जाण्यासाठी या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकत पुढील पाया भक्कम करण्यासाठी राजकीय नेत्यांनी गावे ताब्यात घेण्याची तयारी केली आहे.
विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. गतवेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा ही निवडणूक थेट सरपंच निवडीने वेगळी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे. यंदा सदस्य एका पक्षाचा व सरपंच एका पक्षाचा होऊ शकतो. त्यामुळे आपल्याच पक्षाचा सरपंच खुर्चीत विराजमान व्हावा यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक यांच्यासह शिवसेनाही आक्रमकतेने उतरली आहे.
२० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी खुला पुरुष-८, खुला महिला-६, ओबीसी पुरुष-१, महिला-४, अनुसूचित जाती पुरुष-१, महिला -१ असे आरक्षण आहे. खुल्या वर्गातील १४ सरपंच दावेदार असल्याने निवडणुका रंगतदार होणार हे निश्चित. दक्षिणमधील ग्रामपंचायतीवर कॉँग्रेसआडून सतेज पाटील गटाचे वर्चस्व होते. आमदार अमल महाडिक यांच्या विजयाने मधल्या काळात महाडिक गटाआडून भाजपने विस्तार वाढविण्यावर भर दिला. कॉँग्रेसच्या ताब्यात असणाºया ग्रामपंचायती ताब्यात घेत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे. पण ग्रामीण भागातील शिवसेनेची ताकदही दुर्लक्षित करता येणार नाही. या निवडणुकांत शिवसेनाही आक्रमकतेने उतरली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांत यश न मिळाल्याने राष्टÑवादी दक्षिणेत खिळखिळी झाली आहे. अटीतटीच्या लढती होणाºया या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत महाडिक गटास भाजपची साथ मिळणार आहे. नोटाबंदी व कर्जमाफीनंतर होणाºया निवडणुकीत पक्षांच्या अस्तित्वाचा लढा होत आहे. स्थानिक नेतृत्वाला हाताशी धरत कॉँग्रेसचा बालेकिल्ला खिळखिळा करण्यासाठी प्रचार करताना विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. ग्रामपंचायतीआडून पाटील-महाडिक गटांत रस्सीखेच सुरू असून, दक्षिणचे राजकीय वातावरण पुन्हा चांगलेच तापले आहे.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायती
वळिवडे, वसगडे, नेर्ली, विकासवाडी, कळंबा, पाचगाव, नागाव, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, कणेरी, कणेरीवाडी, दिंडनेर्ली, हणबरवाडी, कावणे, दºयाचे वडगाव, चुये, निगवे खालसा, उचगाव, कंदलगाव, मोरेवाडी.

Web Title: Rashikhai Amahar Patil for 20 South Panchayats.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.