रसिक आजरेकरांनी जपली नाट्यसंस्कृती विजय कदम : रमेश टोपले नाट्यमहोत्सव; ‘अशुद्ध बीजापोटी’ नाटक प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:57 AM2018-01-17T00:57:31+5:302018-01-17T00:58:36+5:30
आजरा : कोकणसंस्कृती लाभलेल्या घाटमाथ्यावरील आजरेकरांनी नाटकाची रसिकता जपून ठेवली आहे. त्यामुळे आजºयाचा रसिक प्रेक्षक हा प्रगतिशील आहे, असे गौरवोद्गार सिनेअभिनेते
आजरा : कोकणसंस्कृती लाभलेल्या घाटमाथ्यावरील आजरेकरांनी नाटकाची रसिकता जपून ठेवली आहे. त्यामुळे आजºयाचा रसिक प्रेक्षक हा प्रगतिशील आहे, असे गौरवोद्गार सिनेअभिनेते विजय कदम यांनी काढले. यावर्षीच्या नाट्यमहोत्सवात कुडाळच्या ‘अशुद्ध बीजापोटी’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला.
येथील कै. रमेश टोपले यांच्या चौथ्या नाट्यमहोत्सवाच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. कदम म्हणाले, ४४ वर्षात रंगभूमीने भरभरून दिले. १२ वर्षांपूर्वी आजरेकरांकडून मिळालेली दाद विसरू शकत नाही. अशोक चराटी सूतगिरणी कामगारासोबत उभे राहिले तर विभागप्रमुखासारखे वाटतात. इतके साधेपण चराटी यांच्यात असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रसिद्धी अभिनेत्री अंशुमाला पाटील म्हणाल्या, आजºयात सुसज्ज नाट्यगृहाची गरज आहे. सर्वांच्या सहकार्यातून येत्या वर्षभरात नाट्यगृह साकारण्याचा प्रयत्न करूया. यावेळी परीक्षक भय्या टोपले, सोनाली टोपले, कलाकार केदारी देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी अशुद्ध बीजापोटी या नाटकास प्रथम क्रमांक मिळाला. बैल अ बोलवाला - सातारा (द्वितीय), इथे ओशाळला मृत्यू - जयसिंगपूर (तृतीय) यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी माजी मुख्याध्यापक व्ही. एस. कुलकर्णी यांनी ५१ हजारांची देणगी नाट्यमहोत्सवाला दिली.
केदार देसाई, राजीव मुळे, सुभाष टाकळीकर (दिग्दर्शक), सानिका कुंटे, वैशाली घाटगे, दीपक देशमुख, अमोल श्ािंदे यांना वैयक्तिक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी अशोक चराटी, डॉ. अनिल देशपांडे, नाट्यमहोत्सव प्रमुख डॉ. चंद्रशेखर फडणीस, जनार्दन टोपले, शरद टोपले, डॉ. अंजनी देशपांडे, प्रा. डॉ. अशोक बाचूळकर, विकास फळणीकर, सचिन इंदुलकर, आदी उपस्थित होते. प्रकाश पाटील व स्वरदा फडणीस यांनी सूत्रसंचालन केले. सचिन सटाले यांनी आभार मानले.
आजरा येथील रमेश टोपले नाट्यमहोत्सवात कुडाळच्या संघाला अभिनेते विजय कदम यांनी बक्षीस दिले. यावेळी अशोक चराटी, डॉ. अनिल देशपांडे, अंशुमाला पाटील, चंद्रशेखर फडणीस, भय्या टोपले आदी उपस्थित होते.