विनोद डिग्रजकर यांना रसिकराज पुरस्कार - रविवारी वितरण : सांगीतिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:35+5:302021-02-05T07:15:35+5:30

कोल्हापूर : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विनोद डिग्रजकर यांना मंगळवारी पहिला सरदार आबासाहेब मुजुमदार रसिकराज पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

Rasikraj Award to Vinod Digrajkar - Sunday Distribution: Musical Program | विनोद डिग्रजकर यांना रसिकराज पुरस्कार - रविवारी वितरण : सांगीतिक कार्यक्रम

विनोद डिग्रजकर यांना रसिकराज पुरस्कार - रविवारी वितरण : सांगीतिक कार्यक्रम

googlenewsNext

कोल्हापूर : ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विनोद डिग्रजकर यांना मंगळवारी पहिला सरदार आबासाहेब मुजुमदार रसिकराज पुरस्कार जाहीर झाला आहे. गायन समाज देवल क्लब व मुजुमदार कुटुंबियांच्यावतीने हा पुरस्कार दिला जाणार असून, संस्थेचे कार्यक्रम समिती प्रमुख श्रीकांत डिग्रजकर यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली. सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुण्यातील मागील पिढीतील रसिकराज श्रीमंत आबासाहेब मुजुमदार यांच्या स्मृती जपण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली असून राम गणेश गडकरी हॉलमध्ये रविवारी (दि. ७ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील ज्येष्ठ कलाकार पंडित सत्यशील देशपांडे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होईल. यावेळी ते रसिकांशी मुक्त संगीत संवाद साधणार आहेत. यानंतर पंडित विनोद डिग्रजकर यांचे शास्त्रीय गायन होईल. डिग्रजकर हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी संगीत विशारद, संगीत अलंकार व शिवाजी विद्यापीठाची संगीतशास्त्र या विषयातील पदविकादेखील संपादन केली आहे. त्यांनी भारतासह परदेशातही शास्त्रीय संगीतातील कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांच्या आजवरच्या सांगीतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिषदेस कार्यवाह सचिन पुरोहित, खजिनदार राजेंद्र पित्रे उपस्थित होते.

--

फोटो नं ०२०२२०२१-कोल-विनोद डिग्रजकर (पुरस्कार)

--

इंदुमती गणेश

Web Title: Rasikraj Award to Vinod Digrajkar - Sunday Distribution: Musical Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.