इचलकरंजीत पाण्यासाठी रास्ता रोको वाहतूक खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:23 AM2021-03-05T04:23:49+5:302021-03-05T04:23:49+5:30
गावभाग परिसरातील नदीवेस भागात पाच दिवसांतून एकदा नळाला पाणी येत आहे. त्यातही पाच दिवस उलटले तरी गुरूवारी पाणी आले ...
गावभाग परिसरातील नदीवेस भागात पाच दिवसांतून एकदा नळाला पाणी येत आहे. त्यातही पाच दिवस उलटले तरी गुरूवारी पाणी आले नाही. वारंवार तक्रारी करूनही पाण्याचे नियोजन कोलमडलेलेच आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीपासूनच अशी परिस्थिती उद्भवत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या परिसरात नेहमीच अवेळी पाणी सोडले जाते. तसेच ते कमी दाबाने येते. या सर्व समस्यांनी हैराण झालेल्या नागरिक व महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. बसमधील प्रवाशांचेही हाल झाले. दोन्ही बाजूला सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती सुर्वे व संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांनी त्यांना धारेवर धरत भंडावून सोडले. अखेर पाणीप्रश्न सोडविण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे थांबवले. आंदोलनात जामदार गल्ली, बागडे गल्ली, शेळके मळा भागातील नागरिक व महिला सहभागी झाले होते.