हापूसची आवक कमी असल्याने दर तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:24+5:302021-03-13T04:46:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यंदा हापूस आंब्याची आवक काहीसी कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात सरासरी पाचशे ...

Rates go up due to low inflow of hapus | हापूसची आवक कमी असल्याने दर तेजीत

हापूसची आवक कमी असल्याने दर तेजीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : यंदा हापूस आंब्याची आवक काहीसी कमी असल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात सरासरी पाचशे रुपये बॉक्सचा दर झाला असून मुंबई, पुणे, सोलापूर, विजापूर बाजारपेठेत हापूसची मागणी वाढली आहे.

यंदा खराब हवामानाचा आंब्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे आंबा खराब झाला झाल्याने सध्या आवक कमी होत आहे. कोल्हापूर बाजार समितीत आता ‘देवगड’ व ‘मालवण’ हापूसची आवक होत आहे. साधारणता रोज ९५० बॉक्स व १०० पेटीची आवक होत आहे. मागणी असली ती दर चढे असल्याचा परिणाम दिसतो. गेल्या वर्षी मार्च महिन्यात आवक चांगली असल्याने आताच्या दरात बॉक्समागे दीडशे ते दोनशे रुपयांचा फरक दिसतो.

कच्च्या आंब्याला गुजरातमध्ये मागणी

कच्च्या हापूस आंब्याला मुंबईसह सुरत, बडोदा, अहमदाबाद येथे अधिक मागणी आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांचा पिकवून विक्री करण्यापेक्षा कच्चा आंबा पाठवण्याकडे कल वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘डायमंड’ शंभर रुपयांना

हापूस आंब्याचे दर प्रतवारीनुसार आहेत. त्यातही ‘डायमंड’ हापूसला मागणीही चांगली आहे. त्यामुळे शंभर रुपयाला एक आंबा विक्री होत आहे.

कोट-

मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाने आंबा बागांना फटका बसला आहे. आवक कमी असल्याने दर चढे असले तरी आवक वाढल्यानंतर दर कमी होतील.

- सलीम बागवान (फळांचे व्यापारी)

फोटो ओळी : कोल्हापुरात सध्या ‘देवगड’ व ‘मालवणी’ हापूसची आवक सुरू आहे. (फोटो-१२०३२०२१-कोल-मँगो) (छाया- नसीर अत्तार)

Web Title: Rates go up due to low inflow of hapus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.