पर्यूषण पर्वानिमित्त रथयात्रेचे आयोजन-जैन बांधवांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 15:28 IST2019-09-05T15:27:40+5:302019-09-05T15:28:57+5:30
रथयात्रा, बग्गी, पारंपरिक वाद्यपथक, भक्तिगीते आणि जैन बांधवांच्या उपस्थितीत पर्यूषण पर्व सांगता उत्सवानिमित्त बुधवारी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. गुजरीतील श्री संभवनाथ जैन मंदिर, श्री वासूपूज्य, लक्ष्मीपुरीतील श्री मुनिसुव्रत, शाहूपुरीतील श्री शांतिनाथ, भक्तिपूजा नगरातील श्री आशापुरा अशा विविध जैन मंदिर ट्रस्टच्या वतीनेरथयात्रा काढण्यात आली.

कोल्हापुरात पर्यूषणपर्व सांगतानिमित्त गुजरीतील संभवनाथ जैन मंदिरातर्फे रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. (छाया : नसीर अत्तार)
कोल्हापूर : रथयात्रा, बग्गी, पारंपरिक वाद्यपथक, भक्तिगीते आणि जैन बांधवांच्या उपस्थितीत पर्यूषण पर्व सांगता उत्सवानिमित्त बुधवारी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. गुजरीतील श्री संभवनाथ जैन मंदिर, श्री वासूपूज्य, लक्ष्मीपुरीतील श्री मुनिसुव्रत, शाहूपुरीतील श्री शांतिनाथ, भक्तिपूजा नगरातील श्री आशापुरा अशा विविध जैन मंदिर ट्रस्टच्या वतीनेरथयात्रा काढण्यात आली.
पर्यूषण पर्वानिमित्त गेले आठ दिवस महावीर वाचन, महावीर स्वामींचा पाळणा, संवत्सरी प्रतीकमन व उपवास, कंठाभरतनम अठ्ठाई, महामृत्युंजयतप, आंचनील श्रेणीतप व मोक्ष दंडतप हे उपवास व आराधना सुरू होती. रोज गच्छाधिपती पुण्यपाल आचार्यदेव सूरीश्वरजी महाराज व आचार्यदेव महाराज, भूजनभूषण, आचार्य वज्रभूषण महाराज यांचे प्रवचन झाले.
पर्यूषण पर्व सांगतानिमित्त या आचार्यांच्या उपस्थितीत बुधवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून रथयात्रा काढण्यात आली. रथात भगवंतांची प्रतिकृती, तसेच देवी-देवतांची वेशभूषा धारण केलेले भक्त सहभागी झाले होते. गुजरी जैन मंदिर, महाद्वार रोड, भेंडे गल्ली, शिवाजी पुतळा, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, महाराणा प्रताप चौकमार्गे पुन्हा संभवनाथ जैन मंदिरात रथयात्रेची सांगता झाली. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी संभवनाथ भगवान ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, अशोक केसरीमल, ईश्वर परमार, लीलाचंद ओसवाल, प्रदीप ओसवाल, भरत ओसवाल, माणिक जैन, राजेश धनराज, उत्तम मांगीलाल, रतन गुंदेशा, सुभाष गुंदेश, दिलीप रायगांधी यांच्यासह श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.