मंत्री राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी, भाजप महिला मोर्चाची जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:13 PM2021-02-27T18:13:38+5:302021-02-27T18:15:09+5:30

Bjp Kolhapur- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करावी, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्यावतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे शनिवारी जोरदार निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे महिला अध्यक्षा गायत्री राऊत यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Rathore's demand for resignation, strong protests of BJP Mahila Morcha | मंत्री राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी, भाजप महिला मोर्चाची जोरदार निदर्शने

 कोल्हापुरात शनिवारी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्यावतीने बिनखांबी गणेश मंदिर परिसरात जोरदार निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन केले. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्दे भाजप महिला मोर्चाची जोरदार निदर्शने बिनखांबी गणेश मंदिराजवळ रास्ता रोको

कोल्हापूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांना तात्काळ अटक करावी, त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाच्यावतीने बिनखांबी गणेश मंदिर येथे शनिवारी जोरदार निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे महिला अध्यक्षा गायत्री राऊत यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून कोल्हापुरातही बिनखांबी गणेश मंदिर परिसरात आंदोलन झाले. यावेळी गायत्री राऊत म्हणाल्या, दडपशाहीचे राजकारण राज्यात होत आहे. मंत्री समर्थक विविध कार्यक्रम करत आहेत. त्याउलट न्याय मागण्यासाठी, हक्कासाठी सर्वसामान्य लोक रस्त्यावर आले, तर त्यांना अटक केली जात आहे.

यावेळी प्रमोदिनी हर्डीकर, स्वाती कदम यांनी मनोगत व्यक्त केले. आसावरी जुगदार, विद्या बनछोडे, स्वाती कदम, सुनीता सूर्यवंशी, गौरी जाधव, दीपा ठाणेकर, कार्तिकी सातपुते, संगीता चव्हाण, सीमा बारामते आदी उपस्थित होत्या.

Web Title: Rathore's demand for resignation, strong protests of BJP Mahila Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.