आजी-माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शिधावाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:16 AM2021-06-27T04:16:28+5:302021-06-27T04:16:28+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती विद्यार्थी सहायता केंद्राच्या वतीने शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधीलकी जपत ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती विद्यार्थी सहायता केंद्राच्या वतीने शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधीलकी जपत अंध बांधवांना महिनाभर पुरेल इतके शिधावाटप करण्यात आले. डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.
शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. आझाद नायकवडी म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी झालेली शाहू जयंती खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा विचार कृतीतून जपणारी आहे. प्रा. डॉ. अनिता बोडके, प्रा. डॉ. टी. के. उदगीरकर, प्रा. प्रभावती उदगीरकर, प्रा. डॉ. पी. यू. लांडे, प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे, प्रा. नीता लाड, प्रा. सौ. दीपाली धावणे, ज्ञानेश्वर हजारे, सुधाकर भांदिगरे, गजानन पाटील, महेश ओतारी, नंदकुमार इंगवले यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळी : आजी-माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीने शाहू जयंतीनिमित्त शनिवारी अंध बांधवांना शिधावाटप करण्यात आले. (फोटो-२६०६२०२१-कोल-प्रवीण कोडोलीकर)