मराठा महासंघाकडून गरजू कुटुंबांना शिधावाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:32+5:302021-06-05T04:18:32+5:30

रूईकर कॉलनी परिसरात परराज्यातून आलेले कारागीर राहत आहेत. ते शिवछत्रपतींचे पुतळे तयार करून कमी दरात घरोघरी पोहोचविण्याचे काम करतात. ...

Ration distribution to needy families from Maratha Federation | मराठा महासंघाकडून गरजू कुटुंबांना शिधावाटप

मराठा महासंघाकडून गरजू कुटुंबांना शिधावाटप

Next

रूईकर कॉलनी परिसरात परराज्यातून आलेले कारागीर राहत आहेत. ते शिवछत्रपतींचे पुतळे तयार करून कमी दरात घरोघरी पोहोचविण्याचे काम करतात. कोरोनामुळे त्यांचा रोजगार थांबला आहे. त्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून शुक्रवारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील आणि उद्योजक संदीप वासनकर यांच्या हस्ते शिधावाटप करण्यात आले. त्यात तांदूळ, साखर, तेल, कांदा, बटाटा, टोमॅटो, पोहे, मीठ आदींचा समावेश होता. या शिधावाटपावेळी बबन रानगे, उदय देसाई, दत्तात्रय वारके, सुनील पाटील, शिवाजी वारके, महादेव केसरकर, अरुण कळकुटगी, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.

चौकट

शिव-शाहू आखाड्यातर्फे उद्या सोहळा

कोरोनामुळे अनेक शिवभक्तांना रायगडावर जाता येणार नाही. त्यांच्यासह कोल्हापूरकरांना शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा पाहता यावा या उद्देशाने शिव-शाहू मर्दानी आखाड्याच्यावतीने कोरोनाबाबतची खबरदारी घेऊन रविवारी (दि.६) सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार असल्याची माहिती या आखाड्याचे प्रमुख अमोल बुचडे यांनी पत्रकाद्वारे दिली.

फोटो (०४०६२०२१-कोल-मराठा महासंघ) : कोल्हापुरात शुक्रवारी रूईकर कॉलनी परिसरातील परराज्यातील कारागीरांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील आणि उद्योजक संदीप वासनकर यांच्या हस्ते शिधावाटप करण्यात आले. यावेळी शेजारी महासंघाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

040621\04kol_8_04062021_5.jpg

===Caption===

फोटो (०४०६२०२१-कोल-मराठा महासंघ) : कोल्हापुरात शुक्रवारी रूईकर कॉलनी परिसरातील परराज्यातील कारागीरांना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील  आणि उद्योजक संदीप वासनकर यांच्या हस्ते शिधा वाटप करण्यात आले. यावेळी शेजारी महासंघाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Ration distribution to needy families from Maratha Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.