इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने रिक्षाचालकांना शिधा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:22 AM2021-05-16T04:22:07+5:302021-05-16T04:22:07+5:30
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची अडचण झाली असून सामाजिक जबाबदारी म्हणून कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने शनिवारी रिक्षाचालक व ...
कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची अडचण झाली असून सामाजिक जबाबदारी म्हणून कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने शनिवारी रिक्षाचालक व नाभिक समाजातील लोकांना शिधा वाटप करण्यात आले.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सहकार्याने उद्योजक पंकज पाटील व उद्योजक बाबासो कोंडेकर कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक आणि सभासद यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे शीधा (धान्य) वाटप करण्यात आले.
गेल्या दीड वर्षापासून लाॅकडाऊनमुळे रिक्षाचालक आणि नाभिक यांना खूपच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदरची परिस्थिती अजूनही तशीच असून सतत होत असलेल्या लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती बिकट होत चालली आहे.
यावेळी, बाबासाहेब कोंडेकर, पंकज पाटील, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाबा इंदुलकर, नाभिक समाजाचे अध्यक्ष झेंडे, रमेश चावरे, राहुल काशीद, प्रशांत मोरे मिलिंद सार्दळ आदी उपस्थित हाेते.
फोेटो ओळी : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या वतीने शनिवारी रिक्षाचालक व नाभिक समाजाला शिधा वाटप करण्यात आला. यावेळी बाबासाहेब कोंडेकर, पंकज पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१५०५२०२१-काेल- कोल्हापूर असोसिएशन)