हेरलेत गरिबांना रेशन, डाॅक्टरांना पीपीई किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:30+5:302021-05-22T04:22:30+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लाॅकडाऊन सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील उद्योग व्यवसाय ही पूर्णपणे बंद आहेत. हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक लाॅकडाऊन सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील उद्योग व्यवसाय ही पूर्णपणे बंद आहेत. हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांची उपासमार सुरु आहे. याची दखल घेऊन कम ऑन इंडिया मित्रमंडळ आणि अमर वड्ड युवा मंचच्या वतीने १०० हून अधिक कुटुंबांना रेशन धान्य किट वाटप करण्यात आले. हेरले मेडिकल असोसिएशनने सुरु केलेल्या मोफत स्वॅब सेंटरला १५ पीपीई किट भेट देण्यात आले.
यावेळी अमर वड्ड, ग्रामपंचायत सदस्य आदिक इनामदार ,सचिन जाधव, सुकुमार लोखंडे विजय वड्ड मोहन जाधव, मनोहर कलकुटकी,महावीर वळीवडे ,विक्रम पाटील यांचेसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
फोटो: हेरले पीपीई किट
हेरले येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात पीपीई किटचे वाटप करताना अमर वड्ड, आदिक इनामदार सुकुमार लोखंडे, सचिन जाधव, मोहन जाधव व अन्य.