रेशन दुकाने ७ फेब्रुवारीपासून तीन दिवस बंद राहणार, नेमकं कारण काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 03:41 PM2023-01-30T15:41:11+5:302023-01-30T15:42:08+5:30
२२ मार्चला संसदेवर मोर्चा काढणार
कोल्हापूर : केंद्र सरकारने जानेवारी २०२३ पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत देण्यात येणारे धान्य थांबवण्यात आले आहे. हे पूर्ववत सुरू करण्यासाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्थ धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने ७ ते ९ फेब्रुवारीपर्यंत धान्य दुकाने बंद ठेवणार आहे, अशी माहिती महासंघाचे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत यादव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
यादव म्हणाले, केंद्र सरकारने मोफत धान्याची याेजनेला डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली असली तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मिळत असलेले धान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर धान्य दुकानदारांचे कमिशन दिलेले नाही.
याबाबत देशभरातील शंभरहून अधिक खासदारांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. यासाठी २२ मार्चला संसदेवर मोर्चा काढणार आहे. यावेळी दीपक शिराळे, श्रीपतराव पाटील, राजन पाटील, गजानन हावलदार, नयन पाटील, सुनील दावणे, सचिन चव्हाण, सागर मेढे आदी उपस्थित हाेते.
खात्यावर थेट पैसे देण्याचा डाव
हळूहळू नागरिकांना रेशन दुकानातून धान्य न देता, त्यांच्या खात्यावर थेट पैसे वर्ग करण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोप यादव यांनी केला.