रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:17 AM2021-07-11T04:17:25+5:302021-07-11T04:17:25+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाची सुरुवात अजूनही निराशाजनकच असून ऊन आणि पाऊस यांचा खेळच सध्या सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ ...

Ratnagiri district still lacks rains | रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही पावसाची हुलकावणी

रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही पावसाची हुलकावणी

Next

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाची सुरुवात अजूनही निराशाजनकच असून ऊन आणि पाऊस यांचा खेळच सध्या सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २४० मिलिमीटर (२६.७१ मिलिमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.

गुरुवारपासून पावसाने जोर घेतला होता. मात्र, एकच दिवसानंतर पुन्हा प्रमाण कमी झाले आहे. ९ ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरुवात केलेल्या पावसाचा जोर काही दिवस कायम राहील, असे वाटत होते. प्रत्यक्षात गुरुवारनंतर ठराविक जोरदार सरी वगळता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जोरदार पाऊस पडेल, असे वाटू लागते. मात्र, थोड्याच वेळात ऊन पडू लागते.

---------------------------------------

सिंधुदुर्गात पावसाची हजेरी

कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पावसाला म्हणावा तसा जोर नसला तरी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील काही भागात शनिवारी काही प्रमाणात पाऊस झाला. त्यात मालवण तालुक्यात सर्वाधिक ६५ मिलिमीटर पाऊस झाला.

Web Title: Ratnagiri district still lacks rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.