आॅनलाईनमध्ये रत्नागिरीची बाजी

By admin | Published: February 10, 2015 11:07 PM2015-02-10T23:07:31+5:302015-02-10T23:54:35+5:30

महावितरण कंपनी: महिनाभरात पावणे दोन कोटींचा महसूल

Ratnagiri sticks to online | आॅनलाईनमध्ये रत्नागिरीची बाजी

आॅनलाईनमध्ये रत्नागिरीची बाजी

Next

रत्नागिरी : घरोघरी इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरणे सोपे झाले आहे. जानेवारी महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातील १३ हजार ३४४ ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरल्यामुळे महावितरणला १ कोटी ७८ लाख ९६ हजार ६० रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सर्वाधिक महसूल रत्नागिरी विभागातून प्राप्त झाला आहे. शिवाय चिपळूण व खेड विभागापेक्षा अधिक महसूल रत्नागिरी शहरातून मिळाला आहे.ई-लर्निंगच्या युगात आता महावितरण कंपनीचा कारभारही संगणकीय होऊ लागला आहे. इंटरनेट सुविधेतून आता महावितरण कंपनीचा महसूल वाढत आहे. रत्नागिरी विभागातील एकूण ७ हजार ३१३ ग्राहकांनी आॅनलाईनव्दारे वीज बील भरल्यामुळे ९८ लाख ९२ हजार २३० रूपयांचा महसूल मिळाला आहे. विभागातंर्गत देवरूखातील ४६९ ग्राहकांनी ६२ हजार १६० रूपये, रत्नागिरी ग्रामीण १ मधून १०९४ ग्राहकांनी १० लाख ६८ हजार ४८० तर ग्रामीण २ मधून ५०३ ग्राहकांनी १२ लाख २७ हजार ४४०, रत्नागिरी शहरातील २५५७ ग्राहकांनी ४७ हजार ८३ हजार ८८० रूपयांचा महसूल महावितरणकडे जमा केला आहे. राजापूर १ मधील १२५७ ग्राहकांनी ८ लाख ३३ हजार ४९०, राजापूर २ मधील ६११ ग्राहकांनी ४ लाख २ हजार ८७० तसेच संगमेश्वरातील ४६५ ग्राहकांनी ५ लाख ३ हजार १४० रूपये वीजबिलाचे भरले आहेत.
चिपळूण विभागातंर्गत शहरातील १३५४ ग्राहकांनी १५ लाख ७८ हजार ७१०, ग्रामीणमधील ३९९ ग्राहकांनी ८ लाख ८२ हजार ६९०, गुहागरमधील ११३६ ग्राहकांनी ११ लाख ५५ हजार ७४०, सावर्डेतील ५१७ ग्राहकांनी ४ लाख ५९ हजार ६०० रू मिळून एकूण ३४०६ ग्राहकांनी ४० लाख ७६ हजार ७४० रूपये वीजबिलाचे भरले
आहेत.
खेड विभागातंर्गत दापोली १ मधील ४९७ ग्राहकांनी ५ लाख २ हजार १४०, दापोली २ मधील ३३९ ग्राहकांनी ६ लाख ९४ हजार ४३०, खेडमधील ४१७ ग्राहकांनी ५ लाख ५१ हजार ८३०, मंडणगड येथील ८०५ ग्राहकांनी ६ लाख ४८ हजार ५७०, लोटे येथील ५६७ ग्राहकांनी १५ लाख ३० हजार १२० मिळून एकूण २६२५ ग्राहकांनी ३९ लाख २७ हजार ९० रूपयांचा महसूल जमा केला आहे.
शहरी भागातून आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल अधिक दिसून येत आहे. रत्नागिरी शहरातून आॅनलाईन वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा अधिक ओढा दिसून येत आहे. त्यामुळेच, खेड व चिपळूण विभागापेक्षा अधिक महसूल रत्नागिरी शहरातून प्राप्त झाला आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातूनही आॅनलाईनव्दारे वीजबिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. कालांतराने याच्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)

विभागनिहाय मिळालेला महसूल

रत्नागिरी विभाग
देवरूख४६९ ग्राहक६२ हजार १६० रूपये
रत्नागिरी ग्रामीण ११०९४ ग्राहक१० लाख ६८ हजार ४८०
ग्रामीण २५०३ ग्राहक१२ लाख २७ हजार ४४०
रत्नागिरी शहर२५५७ ग्राहक४७ हजार ८३ हजार ८८० रूपये
राजापूर ११२५७ ग्राहक८ लाख ३३ हजार ४९०
राजापूर २६११ ग्राहक४ लाख २ हजार ८७०
संगमेश्वर४६५ ग्राहक५ लाख ३ हजार १४० रूपये
एकूण ग्राहक७ हजार ३१३९८ लाख ९२ हजार २३० रूपये


चिपळूण विभाग
शहर१३५४ ग्राहक१५ लाख ७८ हजार ७१०
ग्रामीण३९९ ग्राहक८ लाख ८२ हजार ६९०
गुहागर११३६ ग्राहक११ लाख ५५ हजार ७४०
सावर्डे५१७ ग्राहक४ लाख ५९ हजार ६००
एकूण ग्राहक३४०६४० लाख ७६ हजार ७४० रूपये

खेड विभाग
दापोली १४९७ ग्राहक५ लाख २ हजार १४०
दापोली २३३९ ग्राहक६ लाख ९४ हजार ४३०
खेड४१७ ग्राहक५ लाख ५१ हजार ८३०
मंडणगड८०५ ग्राहक६ लाख ४८ हजार ५७०
लोटे५६७ ग्राहक१५ लाख ३० हजार १२०
एकूण ग्राहक२६२५३९ लाख २७ हजार ९० रूपये

रत्नागिरी विभागातील एकूण ७ हजार ३१३ ग्राहकांनी आॅनलाईनव्दारे भरले वीजबिल.
चिपळूण विभागातंर्गत शहरातील १३५४ ग्राहकांनी १५ लाख ७८ हजार ७१०, ग्रामीणमधील ३९९ ग्राहकांनी ८ लाख ८२ हजार ६९० भरले आॅनलाईन वीजबिल.
शहरी भागातून आॅनलाईन विजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल अधिक.
रत्नागिरी शहरातून आॅनलाईन वीजबील भरण्याकडे ग्राहकांचा अधिक ओढा.
खेड, चिपळूण विभागापेक्षा रत्नागिरी शहरातून अधिक महसूल.

Web Title: Ratnagiri sticks to online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.