रत्नागिरी येथे आॅगस्टमध्ये पुरुषोत्तम करंडक रंगणार
By admin | Published: July 25, 2014 08:55 PM2014-07-25T20:55:44+5:302014-07-25T22:16:27+5:30
छोट्या छोट्या गावात दडलेला कलाकार रसिकांसमोर यावा, या उद्देशाने
रत्नागिरी : महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा १६ व १७ आॅगस्ट रोजी रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे घेण्यात येणार आहे. छोट्या छोट्या गावात दडलेला कलाकार रसिकांसमोर यावा, या उद्देशाने प्रामुख्याने गेली ५० वर्षे पुण्यामध्ये होणारी ही स्पर्धा, गेली तीन वर्षे रत्नागिरीमध्ये आयोजित केली जाते. स्पर्धेच्या वैशिष्ट्यपूर्ण व नेटक्या आयोजनामुळे ही स्पर्धा उत्तरोत्तर रसिकाभिमुख होऊ लागली आहे. रत्नागिरीप्रमाणे कोल्हापूर, जळगाव, नागपूर, मुंबई अशा विविध शहरांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाते. अत्युच्च शिखरावर असणारे आजचे अनेक आघाडीचे कलाकार या स्पर्धेमधूनच पुढे आले असल्याने साहजिकच ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा सलग चौथ्या वर्षी १६ व १७ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत रंगणार आहे. प्रवेशाची अंतिम तारीख १० आॅगस्ट आहे. वेळापत्रकही त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. अत्युच्च महाविद्यालयीन संघांनी अधिक माहितीकरिता अनिल दांडेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)