‘रवळनाथ’च्या गृहकर्जाचा व्याजदर ८.५० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:22 AM2021-05-01T04:22:32+5:302021-05-01T04:22:32+5:30
गडहिंग्लज : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्सतर्फे महिला व सैनिकांसाठी १ मे २०२१ पासून गृहकर्जाचा व्याजदर ८.५० टक्के तर ...
गडहिंग्लज : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्सतर्फे महिला व सैनिकांसाठी १ मे २०२१ पासून गृहकर्जाचा व्याजदर ८.५० टक्के तर इतरांसाठी ८.७५ इतका करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.
चौगुले म्हणाले, ‘रवळनाथ’च्या गृहकर्जाच्या मुद्दल व व्याजाला आयकरात सवलत आहे. अन्य कोणत्याही वित्तीय संस्थांकडील कर्जाच्या हस्तांतरणाची सोय आहे.
गृहकर्जासाठी प्रॉपर्टी, विमा पॉलिसी तारण घेतले जात असून कर्जाची वसुली पगारातूनच होते. त्यामुळे सर्व कर्जे सुरक्षित आहेत. त्यामुळे संस्थेकडील सर्व ठेवीही सुरक्षित आहेत. घरबांधणीसह घरखरेदी, घरदुरुस्ती, फ्लॅट व एन.ए. प्लॉट खरेदीसाठी ७५ लाखांपर्यंत कर्जाची सुविधा आहे.
३० एप्रिलअखेर संस्थेकडे ३१५ कोटींच्या ठेवी असून २१९ कोटींची कर्जे वितरीत केली आहेत. संस्थेने ११६ कोटींची गुंतवणूक केली आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगांव जिल्ह्यांत बेळगांव व निपाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कुडाळ येथे मिळून एकूण ९ शाखा सुरू आहेत, असेही चौगुले यांनी सांगितले.
-----------------------
* एम. एल. चौगुले : ३००४२०२१-गड-०५