पानसरे स्मृतिदिनी शनिवारी रविशकुमार, कुमार केतकर कोल्हापूरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 06:08 PM2021-02-13T18:08:46+5:302021-02-13T18:12:04+5:30

Ravish Kumar kolhapur -ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचा ६ वा स्मृतिदिन येत्या शनिवारी (दि. २०) आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सायंकाळी ५.३० वा. एनडीटीव्ही वाहिनीचे कार्यकारी संपादक व निर्भीड पत्रकार रविशकुमार यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Ravi Kumar's lecture on Pansare Memorial Day on Saturday | पानसरे स्मृतिदिनी शनिवारी रविशकुमार, कुमार केतकर कोल्हापूरात

पानसरे स्मृतिदिनी शनिवारी रविशकुमार, कुमार केतकर कोल्हापूरात

Next
ठळक मुद्देपानसरे स्मृतिदिनी शनिवारी रविशकुमार, कुमार केतकर कोल्हापूरातव्याख्यानाचे लाईव्ह प्रसारण

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचा ६ वा स्मृतिदिन येत्या शनिवारी (दि. २०) आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सायंकाळी ५.३० वा. एनडीटीव्ही वाहिनीचे कार्यकारी संपादक व निर्भीड पत्रकार रविशकुमार यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

“भारतीय लोकशाहीचा भविष्यवेध” या विषयावर ते व्याख्यान देतील. ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य कुमार केतकर हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या व्याख्यानाचे लाईव्ह प्रसारण स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांसाठी दसरा चौकातील शाहू स्मारक भवन मुख्य सभागृहात करण्यात येणार आहे.

श्रमिक प्रतिष्ठानच्यावतीने सर्व समविचारी संघटना व व्यक्तींची बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी ८ वाजता पानसरे यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते जमतील. सागरमाळ परिसरात त्यांच्या स्मृतिनिमित्त मॉर्निंगवॉक होईल व समारोप पानसरे यांच्या नियोजित स्मारक स्थानी होईल.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करतील. प्रतिष्ठानच्या बैठकीस दिलीप पवार, बाबूराव तारळी, व्यंकाप्पा भोसले, प्रा. उदय नारकर, डॉ. मेघा पानसरे, एस. बी. पाटील, आनंदराव परुळेकर, रसिया पडळकर, यश आंबोळे, के. पी. तांबेकर, सागर मळगे, आय. बी. मुन्शी, अशोक यादव व इतर उपस्थित होते.

 

Web Title: Ravi Kumar's lecture on Pansare Memorial Day on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.