मुक्त विद्यापीठ कृषी विद्यार्थ्यांना शनिवार-रविवारी परीक्षेची फेर संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:11+5:302021-07-29T04:25:11+5:30

कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष ऑनलाइन परीक्षेला मुकावे लागले होते. अशा ...

Re-opportunity of Saturday-Sunday examination for open university agriculture students | मुक्त विद्यापीठ कृषी विद्यार्थ्यांना शनिवार-रविवारी परीक्षेची फेर संधी

मुक्त विद्यापीठ कृषी विद्यार्थ्यांना शनिवार-रविवारी परीक्षेची फेर संधी

googlenewsNext

कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष ऑनलाइन परीक्षेला मुकावे लागले होते. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी पुन्हा परीक्षा देण्याची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने यावर्षी कृषी विभागाच्या प्रमाणपत्र, पदविका व पदवी परीक्षा २३ जुलैपासून प्रथमच ऑनलाइन पद्धतीने आयोजित केल्या होत्या. मात्र, २३ जुलैपासून कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, नेटवर्क नसणे, दरड कोसळणे व अन्य तांत्रिक कारणांनी काही विद्यार्थ्याना परीक्षा देता आली नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पुन्हा ऑनलाइन परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे.

३१ जुलै व १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत विद्यार्थ्याना ही परीक्षा देता येईल, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक व कोल्हापूर विभागीय वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. डॉ. आर. व्ही. कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Re-opportunity of Saturday-Sunday examination for open university agriculture students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.