भुदरगड तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचे फेरआरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:01+5:302021-02-23T04:38:01+5:30

गारगोटी : २०२० ते २०२५ या कालावधीकरिता भुदरगड तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे फेरआरक्षण भुदरगड पंचायत समिती सभागृहात ...

Re-reservation of 60 gram panchayats in Bhudargad taluka announced | भुदरगड तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचे फेरआरक्षण जाहीर

भुदरगड तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचे फेरआरक्षण जाहीर

googlenewsNext

गारगोटी :

२०२० ते २०२५ या कालावधीकरिता भुदरगड तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे फेरआरक्षण भुदरगड पंचायत समिती सभागृहात घोषित करण्यात आले. त्यामध्ये १२ ग्रामपंचायतींचे आरक्षण बदलून नवे आरक्षण पडले, तर ४८ ग्रामपंचायतींचे आरक्षण ‘जैसे थे’च राहिले.

तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी आरक्षणाची घोषणा केली.

नव्याने फेरआरक्षण झालेली गावे, कंसात जुने आरक्षण : व्हनगुत्ती-सर्वसाधारण (सर्वसाधारण स्त्री), आंबवणे-सर्वसाधारण (सर्वसाधारण स्त्री), निष्णप- कुंभारवाडी-सर्वसाधारण (सर्वसाधारण स्त्री), महालवाडी-सर्वसाधारण (सर्वसाधारण स्त्री), तांबाळे-सर्वसाधारण (सर्वसाधारण स्त्री), अनफ खुर्द-सर्वसाधारण स्त्री (सर्वसाधारण), दोनवडे-सर्वसाधारण स्त्री (सर्वसाधारण), लोटेवाडी-सर्वसाधारण स्त्री (सर्वसाधारण), दारवाड-सर्वसाधारण (सर्वसाधारण स्त्री), फणसवाडी-सर्वसाधारण (सर्वसाधारण स्त्री), नाधवडे-सर्वसाधारण स्त्री (सर्वसाधारण), शिवडाव-सर्वसाधारण स्त्री (सर्वसाधारण) या गावांचे आरक्षण बदलून नव्याने आरक्षण पडले.

मडिलगे बुद्रुक, मिणचे बुद्रुक, फये, डेळे, चिवाळे, वासनोली, मुदाळ, कोंडोशी, दासेवाडी, अनफ बुद्रुक, तिरवडे- कुडतरवाडी, पडकंबे, देऊळवाडी, ममदापूर, नितवडे, नवरसवाडी, भालेकरवाडी, थड्याचीवाडी, सालपेवाडी, पारदेवाडी, न्हाव्याची वाडी, अंतिवडे, शेणगाव, पुष्पनगर, म्हासरंग, नांदोली, करबंळी, वेसर्डे, देवर्डे आदी गावांचे आरक्षण सर्वसाधारण स्त्री होते, ते फेरआरक्षणातही कायम राहिले.

हेदवडे, गिरगाव, वेंगरूळ, पांगिरे, कोळवण, पाळेवाडी, बामणे, बसरेवाडी, अंतुर्ली, पाचर्डे, बेडीव, कारिवडे, गारगोटी, शिंदेवाडी, म्हसवे, टिक्केवाडी, बारवे, पळशिवणे, सोनारवाडी, पाळ्याचा हुडा, खेडगे- एरंडपे, पंडिवरे, चांदमवाडी आदी गावांचे आरक्षण सर्वसाधारण पडले होते. फेरआरक्षणातही ते आरक्षण ‘जैसे थे’ राहिले.

Web Title: Re-reservation of 60 gram panchayats in Bhudargad taluka announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.