प्रत्येक लाभार्थीपर्यंत शासकीय योजना पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:30 AM2021-08-14T04:30:26+5:302021-08-14T04:30:26+5:30

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक तहसीलदार कार्यालयात तहसीलदार मैमुन्निसा संदे आणि अनुदान योजना ...

Reach the government scheme to every beneficiary | प्रत्येक लाभार्थीपर्यंत शासकीय योजना पोहोचवा

प्रत्येक लाभार्थीपर्यंत शासकीय योजना पोहोचवा

Next

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक तहसीलदार कार्यालयात तहसीलदार मैमुन्निसा संदे आणि अनुदान योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र पायमल यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी आमदार जाधव यांनी समितीला मार्गदर्शन केले. या बैठकीत एकूण १४० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ८४ प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेची दोन, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची ५४ प्रकरणांचा समावेश आहे. बैठकीस समिती सदस्य मिलिंद वावरे, दीपाली शिंदे, शशिकांत बिडकर, सुनील देसाई, विशाल चव्हाण, चंदा बेलेकर, रफिक शेख, आदी उपस्थित होते.

फोटो (१३०८२०२१-कोल-योजना समिती बैठक) कोल्हापुरात शुक्रवारी तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक झाली. त्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव, तहसीलदार मैमुन्निसा संदे, आदी उपस्थित होते.

130821\13kol_5_13082021_5.jpg

फोटो (१३०८२०२१-कोल-योजना समिती बैठक) कोल्हापुरात शुक्रवारी तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक झाली. त्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव, तहसीलदार मैमुन्निसा संदे, आदी उपस्थित होते.

Web Title: Reach the government scheme to every beneficiary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.