केंद्र सरकारच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:08+5:302021-02-23T04:38:08+5:30
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने महिला सबलीकरणासाठी ज्या योजना आखल्या आहेत, त्या सर्व ...
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने महिला सबलीकरणासाठी ज्या योजना आखल्या आहेत, त्या सर्व महिलांपर्यंत पोहोचवून महापालिका निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढविण्याचे आवाहन महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांनी केले.
त्यांनी महानगरपालिका निवडणूक संघटनात्मक रचनेबाबत मार्गदर्शन केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीबाबत देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनीही मार्गदर्शन केले. महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांनी भाजपाच्या सात महिला मंडल अध्यक्षांना निवडीचे पत्र देऊन घोषणा केली.
सुरभी घाटगे- शिवाजी पेठ मंडल, वंदना नायकवडी उत्तरेश्वर पेठ, निकिता यादव राजारामपुरी, अश्विनी साळोखे यांची लक्ष्मीपुरी मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी कोल्हापूर महिला आघाडी प्रभारी सुवर्णा पाटील, किशोरी स्वामी, प्रमोदिनी हर्डीकर, आसावरी जुगदार, सुषमा गर्दे, मंगल निप्पाणीकर, स्वाती कदम, गौरी जाधव, शुभांगी चितारे, श्वेता कुलकर्णी यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
२२०२२०२१ कोल बीजेपी ०१
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्याहस्ते सोमवारी महिला पदाधिकाऱ्यांना निवडपत्रे देण्यात आली. यावेळी महेश जाधव, सुवर्णा पाटील, गायत्री राऊत उपस्थित होत्या.