आपटेनगर येथील खुनाला वाचा ,आईच्या निधनानंतर पत्नीचा खून : पतीची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 05:03 PM2019-03-13T17:03:28+5:302019-03-13T17:07:25+5:30

आईच्या निधनानंतर पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद दिसल्याच्या रागातून इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकून फरशी डोक्यात घालून पत्नीचा निर्घृण खून केल्याची कबुली पतीने दिली. संशयित संदीप मधुकर लोखंडे (वय ४०, रा. आपटेनगर) असे त्याचे नाव आहे. जुना राजवाडा पोलिसांनी खोलवर आणि कौशल्यपूर्वक तपास करून पाच दिवसांनी अखेर खुनाचा उलगडा केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेबाबत ‘लोकमत’ने पहिल्या दिवशीच शुभांगीच्या खुनाची शक्यता वर्तविली होती, ते वृत्त खरे ठरले.

Read the blood of Apteenagar, wife's murder after her mother's death: husband's confession | आपटेनगर येथील खुनाला वाचा ,आईच्या निधनानंतर पत्नीचा खून : पतीची कबुली

आपटेनगर येथील खुनाला वाचा ,आईच्या निधनानंतर पत्नीचा खून : पतीची कबुली

ठळक मुद्देआपटेनगर येथील खुनाला वाचा, आईच्या निधनानंतर पत्नीचा खून पतीची कबुली : इमारतीवरून खाली फेकून फरशीने डोक्यात घाव

कोल्हापूर : आईच्या निधनानंतर पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद दिसल्याच्या रागातून इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकून फरशी डोक्यात घालून पत्नीचा निर्घृण खून केल्याची कबुली पतीने दिली. संशयित संदीप मधुकर लोखंडे (वय ४०, रा. आपटेनगर) असे त्याचे नाव आहे. जुना राजवाडा पोलिसांनी खोलवर आणि कौशल्यपूर्वक तपास करून पाच दिवसांनी अखेर खुनाचा उलगडा केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या घटनेबाबत ‘लोकमत’ने पहिल्या दिवशीच शुभांगीच्या खुनाची शक्यता वर्तविली होती, ते वृत्त खरे ठरले.

आपटेनगर येथील मालती मधुकर लोखंडे (७०) यांचे कर्करोगाने दि. ९ मार्चला पहाटे साडेचारच्या सुमारास निधन झाले. त्यानंतर सून शुभांगी संदीप लोखंडे (३९) हिने सासूच्या निधनाच्या धक्क्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुढे आली. घटना संशयास्पद असल्याने पोलिसांनी खोलवर जाऊन कौशल्यपूर्वक तपास केला. घरातील पती, सासरे, मुलगा यांच्या प्रत्येकाच्या चौकशीमध्ये विसंगती दिसून आली.

पती संदीप हा उडवाउडवीचीआणि असमाधानकारक उत्तरे देत होता. त्याला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने पत्नी शुभांगीच्या खुनाची कबुली दिली. या गुन्ह्यामध्ये पोलीस स्वत: फिर्यादी झाले आहेत. घटना उघडकीस आणण्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, निरीक्षक प्रमोद जाधव, सहायक निरीक्षक ए. डी. माने, उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, तेजस्विनी पाटील, हवालदार एकनाथ चौगले, प्रीतम मिठारी, परसू गुजरे, रंगराव चव्हाण, सचिन देसाई, बजरंग लाड, गजानन परीट, संदीप बेंद्रे, नितीन कुराडे, प्रदीप पाटील, आदींनी परिश्रम घेतले.

असा केला खून

माझ्या दीड वर्षाच्या मुलाचे अपघाती निधन झाले. त्याला पत्नी शुभांगीच जबाबदार होती. ती घरामध्ये व्यवस्थित वागत नव्हती. जेवण वेळेवर बनवत नव्हती. घरामध्ये स्वच्छता ठेवत नव्हती. आई-वडिलांशी वाद घालून त्यांची सेवा करण्यास टाळाटाळ करायची. आई कर्करोगाने अंथरुणाला खिळून होती. तिची सेवा तिने केली नाही. आई मरायची वाट ती बघत होती. शनिवारी पहाटे आई बोलायची बंद झाली. तिची हालचाल होत नव्हती; म्हणून मी तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला; परंतु आईने कसलाच प्रतिसाद दिला नाही. तिचा श्वासही बंद झाला होता. तिचे निधन झाल्याची खात्री झाल्यानंतर मी, वडील आणि मुलगा आईच्या शेजारी धीरगंभीर अवस्थेत बसून होतो.

यावेळी पत्नी शुभांगी ‘इतक्यात काही होत नाही, काळजी करू नका,’ असे म्हणत झाडू व सुपली ठेवण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला राग आला. मी तिच्या मागून गेलो. पहिल्या मजल्यावरून पाठीमागून धक्का देऊन तिला खाली फेकले. फरशीवर पडून तिच्या डोक्याला दुखापत झाली, परंतु ती जिवंत होती. खाली येऊन फरशी तिच्या डोक्यात घातली. ती मृत झाल्याचे लक्षात येताच मृतदेह बाजूला सरकवून ठेवला. त्यानंतर शांत बसून तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला, अशी कबुली संशयित संदीप लोखंडे याने दिली.


अंगाऱ्याचा बनाव


शुभांगीच्या खुनाचा संशय येऊ नये, यासाठी आईच्या निधनानंतर ती अंगारा घेऊन टेरेसवर गेली. तो फुंकताना ती खाली पडल्याचा बनाव करण्यासाठी संशयित पती संदीप याने टेरेसवर जाऊन अंगारा ठेवला. तशी कबुली त्याने स्वत: दिली. शुभांगीला कसे मारले याचे प्रात्यक्षिकही त्याने पोलिसांना दाखविले.

वडील, मुलावर दबावाची शक्यता

संदीप लोखंडे हा खासगी वाहनचालक आहे. तो पहिल्यापासून तापट स्वभावाचा आहे. वारंवार पत्नीशी भांडण काढून तो तिला मारहाण करीत असे. घटनेच्या पंधरा दिवसांपूर्वी त्याने शुभांगीशी वाद घातला होता. तो जवळच्या नातेवाइकाने मध्यस्थी करून मिटविला होता. घरामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू होऊनही कुणाच्याही डोळ्यांत अश्रू नव्हते. सर्वजण नि:स्तब्ध बसून होते. शुभांगीचा खून डोळ्यांसमोर होऊनही सासरे मधुकर लोखंडे व तिचा मुलगा शिवतेज गप्प बसून होते. या दोघांवर संशयित संदीप याने दबाव टाकला होता का? याबाबत सखोल चौकशी केली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.
 

 

Web Title: Read the blood of Apteenagar, wife's murder after her mother's death: husband's confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.