‘लोकमत’च्या धमाकेदार आॅफरच्या नोंदणीसाठी वाचकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 05:16 PM2019-12-24T17:16:32+5:302019-12-24T17:20:17+5:30
‘लोकमत’ने कोल्हापुरातील वाचकांसाठी धमाकेदार आॅफर सुरूकेली आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळत असून, नोंदणीसाठी वाचकांची ‘लोकमत’ कार्यालयासह भेटवस्तू वाटप केंद्रावर गर्दी होत आहे. या केंद्रावर दिवसभर वाचकांची गर्दी राहिली. या वाचक वर्गणीदार योजनेत वाचकाने २०० रुपये भरून ‘लोकमत’ची नोंदणी केल्यानंतर त्वरित ६५० रुपयांची आकर्षक भेटवस्तू मोफत मिळत आहे.
कोल्हापूर : ‘लोकमत’ने कोल्हापुरातील वाचकांसाठी धमाकेदार आॅफर सुरूकेली आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळत असून, नोंदणीसाठी वाचकांची ‘लोकमत’ कार्यालयासह भेटवस्तू वाटप केंद्रावर गर्दी होत आहे. या केंद्रावर दिवसभर वाचकांची गर्दी राहिली. या वाचक वर्गणीदार योजनेत वाचकाने २०० रुपये भरून ‘लोकमत’ची नोंदणी केल्यानंतर त्वरित ६५० रुपयांची आकर्षक भेटवस्तू मोफत मिळत आहे.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांतील प्रश्न मांडणे आणि ते सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या ‘लोकमत’ने कोल्हापुरातील वाचकांसाठी १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी धमाकेदार आॅफर सुरूकेली आहे. त्याअंतर्गत ‘लोकमत’च्या नोंदणीसाठी वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
वाचकांच्या सोयीसाठी ‘लोकमत’ने शहराच्या विविध १२ ठिकाणी भेटवस्तू वाटपाची सोय केली आहे. ही केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहतील. तिथे आवश्यक ती कागदपत्रे जमा केल्यावर तातडीने स्टीलची कुकवेअरची दोन भांडी वाचकांना मिळतील. दर्जेदार अंक आणि त्याबरोबरच पुन्हा तितकीच चांगली भेटवस्तू असा दुहेरी लाभ मिळत असल्याने वाचकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दुसऱ्या भेटवस्तूसाठी उद्या अखेरचा दिवस
‘लोकमत’ वाचक वर्गणीदार योजनेतील (सन २०१८ ते २०) दुसऱ्या भेटवस्तूचे वाटप सुरू आहे. ज्या वाचकांनी आपला अंक विक्रेत्याकडून नोंदणी (बुक) केला असेल, त्यांनी आपले कुपन आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याकडून मागून घ्यावे. या योजनेतील दुसरी भेटवस्तू बुधवार (दि. २५ डिसेंबर)पर्यंत दिली जाणार आहे.
नोंदणीसाठी धनादेश, ओळखपत्र आवश्यक
या योजनेंतर्गत वाचकाने दरमहा १०० रुपये वृत्तपत्र विक्रेत्यास द्यायचे आहेत. ही योजना १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीसाठी सुरू राहील. या योजनेसाठी वाचकांनी रोख २०० रुपये किंवा तेवढ्याच रकमेचा धनादेश, छायाचित्र असलेले कोणतेही ओळखपत्र व स्थानिक वृत्तपत्र विके्रत्याचे सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये भरलेले कोणत्याही एका महिन्याचे बिल सोबत आणणे आवश्यक आहे.
‘लोकमत’मध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित अचूक माहिती मिळते. सखी पुरवणीतील लेख वाचनीय असतात. आता ‘लोकमत’ने वाचकांसाठी दोन वर्षांची चांगली योजना सुरू केली आहे. त्यातील भेटवस्तू चांगली आहे.
-मीनल शिराळे,
रविवार पेठ, कोल्हापूर.
‘लोकमत’च्या अंकात स्थानिक बातम्या भरपूर असतात. या बातम्यांमध्ये अचूकता, सत्यता असते. राज्यासह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींची माहितीदेखील मिळते. ‘लोकमत’ने सध्या सुरूकेलेली वर्गणीदार योजना वाचकांसाठी उपयुक्त ठरणारी आहे.
- अॅड. संभाजीराव पाटील-गुडाळकर,
शिरगावकर कॉलनी, सानेगुरुजी वसाहत
भेटवस्तू वाटपाची केंद्रे अशी
- लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी.
- लोकमत एमआयडीसी कार्यालय, शिये फाट्याजवळ
- राजर्षी शाहू विद्यामंदिर, कसबा बावडा
- पोपटराव जगदाळे हॉल, राजारामपुरी पहिली गल्ली
- गीता मंदिरसमोर, गाळा नंबर ८, मोहसीन गॅरेजजवळ, कावळा नाका
- आनंद प्रोव्हिजनल स्टोअर्स, गणपती मंदिराजवळ, टेंबलाईवाडी
- इंदिरासागर हॉल, संभाजीनगर
- साने गुरुजी वसाहत गृहनिर्माण संस्था कार्यालय
- निवृत्ती तालुका संघ, फुलेवाडी (दत्त मंगल कार्यालयामागे)
- श्री महाकाली मंदिर, शिवाजी पेठ
- देवी पार्वती मंदिर, वडणगे
- श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स, गोकुळ शिरगाव