पोलिसांची तत्परता अन्‌ तरुणाचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:18 AM2021-06-29T04:18:16+5:302021-06-29T04:18:16+5:30

कोल्हापूर : ‘कंपनीशी केलेले डील पूर्ण होत नसल्याने मी जीव देतो’ असा मोबाईलवर स्टेटस ठेवलेल्या तरुणाचा जुना राजवाडा पोलीस ...

The readiness of the police saved the life of the youth | पोलिसांची तत्परता अन्‌ तरुणाचा वाचला जीव

पोलिसांची तत्परता अन्‌ तरुणाचा वाचला जीव

Next

कोल्हापूर : ‘कंपनीशी केलेले डील पूर्ण होत नसल्याने मी जीव देतो’ असा मोबाईलवर स्टेटस ठेवलेल्या तरुणाचा जुना राजवाडा पोलीस व सायबर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने जीव वाचला. कोल्हापुरातून गायब झालेल्या तरुणाचा पोलिसांनी अवघ्या तीन तासांत शोध लावला. संबंधित तरुण मिरज येथे आढळला. तरुणाचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या मदतीमुळे नातेवाइकांच्या डोळ्यांत अश्रू उभारले.

घटना अशी, सोमवारी दुपारी अंकुश राजाराम पाटील (रा. माजगावकर नगर, फुलेवाडी, रिंगरोड) हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी, चुलतभाऊ सुनील पाटील (वय २५, रा. तळगावपैकी भुजंगपाटील वाडी, ता. राधानगरी) हा सकाळी नवीन वाशीनाका येथून कोठेतरी गेला आहे, त्याने मोबाईलवर स्टेटस ‘मी जीव देतो’ असा ठेवला, तो फोन उचलत नसल्याची तक्रार सांगितली. त्यावेळी कर्तव्यावरील ठाणे अंमलदार पो. हवालदार ऋषीकेश ठाणेकर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पो. नि. प्रमोद जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बेपत्ता पाटील याचा मोबाईल नंबर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस सागर माळवी यांना दिला. माळवी यांनीही तत्काळ दिलेल्या तांत्रिक माहितीवरून अंकुश पाटील हे भावाच्या शोधासाठी अमर टॉकीज, मिरजकडे रवाना झाले. थोड्या वेळाने सायबर पोलिसांकडून दुसरी माहिती प्राप्तनुसार बेपत्ता पाटील हे बॉम्बे चाॅकलेटजवळ मिरज येथे असल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे नातेवाइकांनी त्या परिसरात पाहणी केली असता सुनील पाटील निराश होऊन बसलेले तेथे आढळले. त्यांना पोलीस ठाण्यात आणले, त्यांची मानसिकता बदलण्यासाठी समुपदेशन केले. पोलीस ऋषीकेश ठाणेकर व ‘सायबर’चे सागर माळवी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तरुणाचा जीव वाचण्यास मदत लाभली, या मदतीमुळे नातेवाइकांच्या डोळ्यांत अश्रू आले.

ऋषीकेश ठाणेकर यांचे कौशल्य

शनिवारी रंकाळा टॉवर येथे का. ठाणेकर यांनी दुचाकीचालकास अडवले, मागे बसलेली अल्पवयीन मुलगी जाणवली, त्यांनी पंढरपूरहून आल्याचे सांगितले, ठाणेकर यांनी त्वरित पंढरपूर पोलिसांशी फोन केला, त्यावेळी ही मुलगी बेपत्ताची नोंद होती. ठाणेकर यांच्या कौशल्याने मुलगी सापडली. गेल्या महिन्यात फुलेवाडीत एकाने आत्महत्येचा स्टेटस मोबाईलवर लावला, त्यावेळीही कॉ. ठाणेकर यांनी तत्परतेने त्याचे मोबाईल लोकेशन शोधले, तासाभरात घटनास्थळी पोहचले, पण दुर्दैवाने त्या व्यक्तीने पाच मिनिटे अगोदरच गळफास लावून घेतला होता.

Web Title: The readiness of the police saved the life of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.