वाचनामुळे जीवनाला योग्य दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:23 AM2021-03-08T04:23:01+5:302021-03-08T04:23:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : वाचनामुळे माणसाच्या जीवनाला योग्य दिशा प्राप्त होते. केवळ बुद्धिमत्ता म्हणजे हुशारी नव्हे, तर नावीन्यपूर्ण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : वाचनामुळे माणसाच्या जीवनाला योग्य दिशा प्राप्त होते. केवळ बुद्धिमत्ता म्हणजे हुशारी नव्हे, तर नावीन्यपूर्ण व कल्पकतेने एखादी गोष्ट करणे म्हणजे बुद्धिमत्ता होय, असे प्रतिपादन मुरलीधर परुळेकर यांनी केले.
येथील सरस्वती हायस्कूलमध्ये वाचकांचा पत्रव्यवहार लेखन कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. डी. शिंदे होते.
स्पर्धेमध्ये आदिती पाटील, श्रेया देवमोरे व समृद्धी गायकवाड या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. मालती माने विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय रेंदाळकर यांना सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. स्वागत एस. व्ही. पाटील यांनी व महावीर कांबळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास आर. एन. जाधव यांच्यासह शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
फोटो ओळी
०७०३२०२१-आयसीएच-०१
सरस्वती हायस्कूलमध्ये वाचकांचा पत्रव्यवहार स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.