मंडलिकरूपी विचारांचे ‘वैभव’ जिल्ह्याला देण्यासाठी सज्ज रहा- सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 09:16 PM2017-10-19T21:16:45+5:302017-10-19T23:10:26+5:30
म्हाकवे : लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे कर्तृत्ववान नेतृत्व जिल्ह्याबरोबरच महाराष्टÑाला मिळाले आहे. त्यांच्या आदर्शवत पायवाटेवर मार्गक्रमण करत विकासाच्या दिशेने वाटचाल करूया.
म्हाकवे : लोकनेते सदाशिवराव मंडलिक हे कर्तृत्ववान नेतृत्व जिल्ह्याबरोबरच महाराष्टÑाला मिळाले आहे. त्यांच्या आदर्शवत पायवाटेवर मार्गक्रमण करत विकासाच्या दिशेने वाटचाल करूया. ते आयुष्यभर वैचारिक लढाई करत त्यांनी लढाऊपणा जोपासला आहे. त्यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होऊया. तसेच आगामी निवडणुका २०१८ मध्ये होऊ द्या किंवा २०१९ मध्ये होऊ द्या. जिल्ह्याचे गतवैभव परत आपल्याकडे आणण्यासाठी सर्व ताकदीनिशी सज्ज राहूया असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले.
हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक कारखाना कार्यस्थळावर कारखाना सभासद, शेतकरी, कर्मचारी व कार्यकर्ते यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन प्रा. संजय मंडलिक होते.
स्व. मंडलिकांच्या कार्यकर्तृत्व आणि गौरवशली कारकिर्दीची आठवण करून देत आ. पाटील म्हणाले, स्व. मंडलिकांना राजकीय संघर्ष हयातभर करावा लागला. लढाईतच माणूस जिवंत राहतो. त्यामुळे संघर्षाने कधी खचून जायचे नाही. हा त्यांचा मूलमंत्र सर्व कार्यकर्त्यांनी अंगीकारला.
मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी स्वागत केले. प्रास्ताविक प्राचार्य जीवन साळोखे यांना केले. यावेळी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, संचालक विरेंद्र मंडलिक, सौ. वैशाली मंडलिक, कागलच्या सभापती सौ. विमल पाटील, प्रकाशराव पाटील, नंदूभाऊ पाटील (बिद्री), शेखर सावंत (बानगे), देवानंद पाटील (निढोरी), आनंद मोरे, रघुनाथ सिरसे (सावर्डे बुद्रुक), सौ. राजश्री चौगुले, विश्वास कुराडे आदी उपस्थित होते. अविनाश चौगुले यांनी आभार मानले.
कागलमध्ये शिवसेनेचे ११ सरपंच : मंडलिक
कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांत अत्यंत गुंतागुंतीचे राजकारण निर्माण झाले. कोणत्या गटाला किती जागा मिळाल्या या संख्याबळात अडकून न पडता गावच्या विकासासाठी एकसंघ रहा व पराजयाने खचून न जाता आणि विजयानंतर हुरळून न जाता जनसामान्यांच्या कामांना महत्त्व द्या. मागल तालुक्यामध्ये मंडलिक व संजयबाबा घाटगे गट शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्रित आहेत. त्यामुळे कागल तालुक्यात शिवसेनेचे २६ पैकी ११ सरपंच निवडून आल्याचेही शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. मंडलिक यांनी सांगितले.