रियल इस्टेट बाजारातील गती वाढली; घरविक्रीच्या श्रावणसरी....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:27 AM2021-08-12T04:27:26+5:302021-08-12T04:27:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुद्रांक शुल्कातील सवलती, जाचक अटींतील सुधारणांनी ग्राहकांकडून घरांना मागणी वाढली आहे. गेल्या दीड वर्षापासूनचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुद्रांक शुल्कातील सवलती, जाचक अटींतील सुधारणांनी ग्राहकांकडून घरांना मागणी वाढली आहे. गेल्या दीड वर्षापासूनचे असलेले कोरोनाचे मळभ बाजूला सारून कोल्हापुरातील रियल इस्टेट बाजारातील गती वाढली असून, घरविक्रीच्या श्रावणसरी सुरू झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये सध्या २५० बांधकाम प्रकल्पांचे काम सुरू असून, सुमारे एक हजार घरे तयार आहेत.
कोरोनामुळे अनेकांना स्वत:चे घर असण्याची गरज जाणवली आहे. त्यामुळे घर खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने यावर्षी घरांच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. ग्राहक हे आपल्या आर्थिक बजेटनुसार वन, टू, थ्री बीएचके, रो बंगलो, रो-हाऊस, आदींमधील पर्यायाची निवड करीत आहेत. बँकांच्या व्याजदरातील कपातीचादेखील गृहखरेदी करणाऱ्यांना मदत होणार आहे. ग्राहकांची मागणी वाढल्याने रियल इस्टेट क्षेत्रातील उत्साह वाढला आहे. गणेशोत्सव, दसरा-दिवाळी या सणांतील मुहूर्तावर गृहखरेदीचे पाऊल टाकण्याची तयारी अनेक जण करीत आहेत. त्यादृष्टीने त्यांनी चौकशी, तयारी सुरू केली आहे.
कोणत्या महिन्यात किती रजिस्टी?
जानेवारी : ७७०६
फेब्रुवारी : ९७७९
मार्च : १०६७२
एप्रिल : ३९८७
मे : १२७०
जून : ५३४०
जुलै : ६३९३
चौकट
रोज ८० रजिस्ट्री
गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात एकूण ४५१४७ रजिस्ट्री (दस्त नोंदणी) झाल्या आहेत. त्यात घर, जमीन खरेदी-विक्री, हक्क सोडपत्र, तारण, गहाण आदींचा समावेश आहे. रोज साधारणत: ७० ते ८० रजिस्ट्री होतात.
स्वत:चे घर घेणारेच अधिक
कोरोनामुळे लोकांना स्वत:च्या घराचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे कोल्हापुरात बहुतांश जण स्वत:चे घर घेणारेच अधिक आहेत. ग्राहकांची घरांना मागणी वाढल्याने रियल इस्टेट बाजाराची गती वाढली आहे. लवकरच कोल्हापूरमध्ये ५० नवीन गृहप्रकल्प सुरू होतील.
-विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रेडाई कोल्हापूर
बांधकाम नियमातील सुधारणा, मुद्रांक शुल्कातील सवलत, व्याजदरातील कपातीमुळे गृह स्वप्न साकारण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. स्वत:च्या घरासाठी अधिकतर जण गुंतवणूक करीत आहेत. शहराबाहेरील सेकंड होमचा विचार काहींनी केला आहे.
-सचिन ओसवाल, बांधकाम व्यावसायिक
म्हणून वाढल्या घरांच्या किमती!
प्लॉट : गेल्या वर्षीपेक्षा यंदा जमिनीच्या दरात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे
सिमेंट : उत्पादक कंपन्यांनी दर वाढविल्याने सिमेंट पोते ३५० रुपयांपर्यंत पोहोचले
स्टील : इंधन दरवाढीमुळे स्टील (सळी) प्रतिटन ६५ हजार झाले आहे
वीट : भाजीव, एसीसी, ब्लॉक विटांचे दर ५ ते १० टक्क्यांनी वाढले आहेत.
वाळू : तुटवड्यामुळे २९ हजार रुपये प्रति ट्रक असा दर झाला आहे. क्रॅश सँडच्या दरात फारशी वाढ नाही.
100821\10kol_1_10082021_5.jpg
(१००८२०२१-कोल-१०२८ डमी)