रियॅलिटी चेक: ३७ हजार बांधकाम कामगार ठरले लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:09+5:302021-06-05T04:17:09+5:30
२२ एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या कामगार : प्रत्येकी १५०० रुपये कामगार आयुक्त कार्यालयाकडील नोंदीत कामगार : ४० हजार आतापर्यंत ...
२२ एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या कामगार : प्रत्येकी १५०० रुपये
कामगार आयुक्त कार्यालयाकडील नोंदीत कामगार : ४० हजार
आतापर्यंत लाभ मिळालेले कामगार : ३७ हजार ७४३
नोंदणी आहे, पण नूतनीकरण नसलेले कामगार : ५० हजार
मदत मिळण्यातील अडचणी
जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगारांची नोंदणी झाली; पण त्यांचे नूतनीकरण न झाल्याने ही खाती अक्रियाशील ठरली आहेत. यातील काही कामगार हे बोगस असले तरी केवळ या प्रक्रियेची माहिती नसल्याने नूतनीकरणापासून वंचित राहिले आहेत. सेवापुस्तकच अपडेट नसल्याने शासनाकडून लाभ मिळण्यात अडचणी.
प्रतिक्रिया
कोविड भत्ता जमा होत असल्याने त्याची आता चिंता नाही; पण बरेच कामगार काेरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च कशातून करायचा, असा प्रश्न आहे. बांधकाम कामगार मंडळाकडे आलेल्या ठेवींमधूनच प्रत्येकी दोन लाख रुपये उपचारासाठी द्यावेत असा आग्रह आहे.
शिवाजी मगदूम, सीटू प्रणित बांधकाम कामगार संघटना