रियॅलिटी चेक:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:34+5:302021-04-26T04:22:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमध्ये जिल्ह्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तावडे हॉटेल-गांधीनगर चौकातून शहरात येणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमध्ये जिल्ह्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तावडे हॉटेल-गांधीनगर चौकातून शहरात येणाऱ्या वाहनधारक, नागरिकांकडे ई-पास, वाहन परवान्याबाबतची कसून चौकशी करण्यात येत होती. पास, परवाना नसल्यास आणि अनावश्यक फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत होती.
या चौकात शहर वाहतूक पोलीस विभागाचे सात कर्मचारी रविवारी तैनात होते. सातारा आणि बेळगावच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनधारकांची येथे तपासणी करण्यात येत होती. वाहनधारकाकडे ई-पास, वाहन परवान्यासह प्रवास करण्याचे कारण विचारण्यात येत होते. ई-पास, वाहन परवाना आणि प्रवासाचे योग्य कारण नसल्यास त्यांचे वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. दुपारी एक वाजेपर्यंत येथून सात वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. आंबे खरेदीला गेलो होतो, रक्तदाबाच्या गोळ्या आणायला गेलो होतो, अशी विविध कारणे सांगत काही वाहनधारक फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मधुकर चौगुले आणि पोलीस नाईक पी. पी. कारेकर यांनी दिली. दरम्यान, या चौकाच्या पुढे शिरोली जकात नाका, ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर चौकातही वाहनधारकांची तपासणी सुरू होती.
फोटो (२५०४२०२१-कोल-तावडे हॉटेल चौक ०१, ०२) :
कोल्हापुरात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हॉटेल-गांधीनगर चौकात रविवारी पोलिसांकडून वाहनधारकांकडे ई-पास, वाहन परवान्याची तपासणी करण्यात येत होती. (छाया : नसीर अत्तार)
===Photopath===
250421\25kol_1_25042021_5.jpg~250421\25kol_2_25042021_5.jpg
===Caption===
फोटो (२५०४२०२१-कोल-तावडे हॉटेल चौक ०१, ०२) : कोल्हापुरात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हॉटेल-गांधीनगर चौकात रविवारी पोलीसांकडून वाहनधारकांकडे ई-पास, वाहन परवान्याची तपासणी करण्यात येत होती. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (२५०४२०२१-कोल-तावडे हॉटेल चौक ०१, ०२) : कोल्हापुरात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हॉटेल-गांधीनगर चौकात रविवारी पोलीसांकडून वाहनधारकांकडे ई-पास, वाहन परवान्याची तपासणी करण्यात येत होती. (छाया : नसीर अत्तार)