रिॲलिटी चेक... मदत आली, पण त्रुटीत अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:11+5:302021-06-05T04:18:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लाॅकडाऊन कालावधीसाठी राज्य शासनाने रिक्षाचालक, वारांगना, बांधकाम मजुरांना जाहीर केलेली मदत ...

Reality check ... help came, but got stuck | रिॲलिटी चेक... मदत आली, पण त्रुटीत अडकली

रिॲलिटी चेक... मदत आली, पण त्रुटीत अडकली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील लाॅकडाऊन कालावधीसाठी राज्य शासनाने रिक्षाचालक, वारांगना, बांधकाम मजुरांना जाहीर केलेली मदत आतापर्यंत निम्म्या लाभार्थींना मिळाली आहे. लाभार्थी व यंत्रणेतील त्रुटीमुळे अनेक जण अद्याप मदतीपासून वंचित राहिले असले तरी केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणारे मोफत धान्य मात्र प्रत्येकाच्या घरी पोहोच झाले आहे. कोल्हापुरातील सगळ्या फेरीवाल्यांना मदत मिळाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात एप्रिलपासून सुरू झाली. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात लॉकडाऊन केला. त्यामुळे समाजातील विविध घटकांना फटका बसला. त्यांना सावरण्यासाठी राज्य शासनाने बांधकाम मजूर, रिक्षा व्यावसायिक, फेरीवाल्यांना मदत देण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर वारांगनांना महिन्याला पाच हजार रुपये असे तीन महिन्यांचे पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णयही शासनाने घेतला होता. राज्य शासनाने लाभार्थींना मदत देण्यास सुरुवात केली असून, आतापर्यंत यातील निम्म्या लाभार्थींना मदत मिळाली आहे. लाभार्थींचे आधार कार्ड लिंक नाही, रिक्षा व्यावसायिकांसह इतर लाभार्थींच्या कागदपत्रात काही त्रुटी असल्याने त्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. फेरीवाल्यांना मात्र सरसकट दीड हजार रुपये मदत मिळाली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे मोफत धान्य मात्र प्रत्येक लाभार्थीला मिळालेले आहे.

मदत मिळण्यास या आहेत अडचणी-

बांधकाम मजूर - वेळेत नूतनीकरण झालेले नाही

रिक्षा व्यावसायिक - आधार कार्डवर फोन क्रमांक नसणे, आधार कार्ड आणि रिक्षा चालविण्याचा परवाना यावरील जन्मतारीख न जुळणे.

वारांगना - आरोग्य तपासणी, हमीपत्र भरलेले नाही.

मदत मिळालेले लाभार्थी -

बांधकाम मजूर - ३७ हजार

रिक्षा व्यावसायिक - ६१३६

वारांगना - ३४५, त्यांची मुले - ३५

फेरीवाले - ७३३३

Web Title: Reality check ... help came, but got stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.