रिॲलिटी चेक : वारांगना व रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:10+5:302021-06-05T04:18:10+5:30

- अनुदान वाटप : फेब्रुवारी २०२१ पासून सुरू - किती मदत मिळते? : १. महिन्याला पाच हजार रुपयांप्रमाणे तीन ...

Reality Check: Prostitution and Ration | रिॲलिटी चेक : वारांगना व रेशन

रिॲलिटी चेक : वारांगना व रेशन

Next

- अनुदान वाटप : फेब्रुवारी २०२१ पासून सुरू

- किती मदत मिळते? : १. महिन्याला पाच हजार रुपयांप्रमाणे तीन महिन्यांचे १५ हजार रुपये, २. बालकांना दरमहा अडीच हजार रुपयांप्रमाणे तीन महिन्यांचे साडेसात हजार.

- एकूण लाभार्थ्यांची संख्या : ७५०

- मदत मिळालेले लाभार्थी : कोल्हापुरातील १५४ वारांगना व १२ मुले. इचलकरंजीतील १९१ वारांगना व २३ बालके.

- मदत न मिळालेले : ३४४ हून अधिक वारांगना व मुले.

- मदत मिळण्यात अडचण काय? : मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी शासनाने निकष घालून दिले आहेत. त्यासाठी महिलांची आरोग्य तपासणी, हमीपत्र भरून देणे, विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. हे निकष पूर्ण न झाल्याने कोल्हापुरातील ३४४ हून अधिक वारांगनांना हे अनुदान अजून मिळालेले नाही. वारांगनांच्या संघटनांचा वादही मदत न मिळण्यास कारणीभूत.

--

लॉकडाऊनमुळे वारांगना महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. मुलांसह घरखर्च कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे. शासनाने लागू केलेल्या योजनेचे अनुदान कोल्हापुरातील ३४४ वारांगनांना अजून मिळालेले नाही. याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला आहे; पण अजूनही आमच्या पदरी एक रुपयाही पडलेला नाही.

- शारदा यादव

अध्यक्ष, वारांगना संघटना

-----

मोफत धान्याने भागविली पोटाची भूक

- मदत जाहीर झालेला महिना : एप्रिल

- काय मदत मिळणार? : माणसी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ

- एकूण लाभार्थी : २५ लाख २८ हजार १३४

- झालेले धान्य वाटप : मे महिन्याचे धान्य केंद्र व राज्य शासनाकडून मोफत

- या योजनेनुसार नागरिकांना धान्य मिळण्यात फारशा अडचणी नाहीत.

रेशनवरील धान्याची लोकांना चांगली मदत होत आहे; परंतु नियमित धान्य व केंद्र सरकारने कोरोनाची मदत म्हणून जाहीर केलेली मदत अशी दोन्ही धान्ये नागरिकांना एकाच वेळी मिळायला हवीत. त्यामुळे दोन वेळा अंगठा द्यावा लागणार नाही व धान्यासाठी लोकांच्या रांगा लागणार नाहीत. संसर्ग टाळायचा असेल तर ते आवश्यक आहे.

- चंद्रकांत यादव

रेशन बचाव समितीचे नेते.

Web Title: Reality Check: Prostitution and Ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.