शेतकऱ्यांना मिळेल आता संधी ; सीमेवरील शेतक-यांना दिलासा - : महिनाभर शेती होती बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 01:21 PM2020-04-17T13:21:37+5:302020-04-17T13:25:35+5:30
सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकऱ्याला आपल्या शेतात जाता येत नव्हते.पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणा-या शेतक-याला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहेशेजारील जिल्ह्यात शेतीकामास जाणाऱ्या शेतकऱ्यांना परवाना
कोल्हापूर : शेजारील जिल्ह्यात सीमाभागात शेती असणाºया शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने जिल्हा सीमेवर असणाºया शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे परजिल्ह्यांत शेती असणाºया अनेक शेतक-यांना शेतीकामासाठी जाता येत नसल्याने अनेक शेतक-यांची अडचण झाली होती.
‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कायद्यामुळे दोन जिल्ह्यांच्या हद्दी सीलबंद झाल्या. अनेक शेतकरी एका जिल्ह्यात राहत असले तरीही त्यांची शेती शेजारील जिल्ह्यात होती. त्यामुळे शेतीकामात शेतक-यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. महिनाभर लॉकडाऊन सुरू राहिल्याने शेजारील जिल्ह्याचा एकमेकांशी संपूर्ण पूर्णपणे तुटला.
जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या मार्गावर मोठमोठे दगड, झाडे तोडून रस्ते अडविले होते. अनेक शेतकरी राहत असलेल्या ठिकाणी त्यांची जनावरे होती; पण शेजारील गावात असणारी शेती दुसºया जिल्ह्याच्या हद्दीत असल्याने अनेक शेतकºयांची कुचंबना झाली होती. सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकºयाला आपल्या शेतात जाता येत नव्हते. पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणाºया शेतकºयाला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.
गावसमितीची संमती आवश्यक
ज्या गावात शेती आहे, त्या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावकामगार तलाठी, पोलीसपाटील यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. परजिल्ह्यातून गावात येणाºयांवर लक्ष ठेवून त्यांची सविस्तर माहिती पोलीस खात्याला देण्याची जबाबदारी त्या कमिटीवर सोपविण्यात आली आहे. शेजारील जिल्ह्यात राहणा-या शेतकºयाची जमीन संबंधित गावात असल्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असते. त्यामुळे या गावसमितीची मान्यता घेऊन शेजारील गावाशेजारील दुसºया जिल्ह्याच्या गावातील शेतकºयाला शेतीकामासाठी येण्याची मुभा देण्यात आली आहे.
अनेक जिल्ह्यांत पिके, धान्य चोरीला
जिल्हा लॉकडाऊन झाल्यामुळे परजिल्ह्यात शेती असणा-या शेतकºयाचा गेले महिनाभर शेतीशी संपर्क तुटला. याचदरम्यान, शेतात डोलणारी उभी पिके, पिकलेले धान्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या आता उघडकीस येऊ लागल्या आहेत.