अरुण लाड यांच्यासमोर बंडखोर उमेदवारांचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 10:40 AM2020-11-19T10:40:39+5:302020-11-19T10:54:57+5:30
pune, elecation, kolhapurnews, politics गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर त्यांच्या पक्षातील बंडखोरांबरोबरच भाजपच्या उमेदवाराचे आव्हान राहणार आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विरोधात डॉ. श्रीमंत कोकाटे आणि नीता ढमाले या अपक्षांसह भाजपचे संग्रामसिंह देशमुख निवडणूक लढवित आहेत. कोल्हापुरातील सहा अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
कोल्हापूर : गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासमोर त्यांच्या पक्षातील बंडखोरांबरोबरच भाजपच्या उमेदवाराचे आव्हान राहणार आहे. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांच्या विरोधात डॉ. श्रीमंत कोकाटे आणि नीता ढमाले या अपक्षांसह भाजपचे संग्रामसिंह देशमुख निवडणूक लढवित आहेत. कोल्हापुरातील सहा अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांच्या विरोधात अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यातील लाड यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. कोकाटे आणि ढमाले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, तर कोल्हापुरातील जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून माघार घेतली. त्यामुळे लाड यांच्यासमोर आता या बंडखोर उमेदवारांसह भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांचे आव्हान आहे.
कोल्हापुरातील अमर माने (उजळाईवाडी), गोवर्धन राजेशिर्के (मोरेवाडी), बळवंत पोवार (पुनाळ), मानसिंग जगताप (राजारामपुरी), सुनील संकपाळ (शेडशाळ), संजय मागाडे (राजेंद्रनगर) हे अपक्ष उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
एकूण ६२ उमेदवार रिंगणात
या मतदारसंघामध्ये ६२ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्यात बाराजण पक्षाकडून, तर ५० उमेदवार अपक्ष म्हणून लढणार आहेत.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
जिल्हा मतदार मतदान केंद्र
एकूण ३६५३५८ ८३५