बांबवडेतील मुलीचा रेबिजने मृत्यू
By admin | Published: February 23, 2017 12:53 AM2017-02-23T00:53:15+5:302017-02-23T00:53:15+5:30
मांजर चावल्याचे निमित्त : वेळीच उपचार नाहीत
कोल्हापूर : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे पिसाळलेल्या मांजराच्या चाव्यात सहा वर्षांच्या मुलीचा रेबिजने अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. इक्रा झाकीर मणेर असे त्या बालिकेचे नाव आहे. इक्राच्या सहवासात आलेल्या घरातील व शाळेतील ३५ मुलांना संभाव्य धोका ओळखून बुधवारी सीपीआरमध्ये रेबिजची लस दिली. तिच्यावर वेळीच उपचार झाले असते तर ही दुर्दैवी वेळ आली नसती. अधिक माहिती अशी, बांबवडे येथील अवचितनगर परिसरात राहणारे झाकीर मणेर हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचा आजारपणात मृत्यू झाला. त्यांना तीन मुली. इक्रा बालवाडीत शिकत होती. परिसरातील पाळीव मांजराचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे मांजर पिसाळले होते. पंधरा दिवसांपूर्वी त्याच मांजराने इक्राच्या हात व पायाचा चावा घेतला. मांजर चावल्याने काही होत नाही, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. गावठी उपचार केले होते. या बालकांना लस बुशरा झाकीर मणेर, गौसिया मणेर, शिफा रियाज अत्तार, मिस्बा रियाज अत्तार, अलवीरा सूरज मणेर, तमन्ना इब्राहिम मणेर, अलिया इब्राहिम मणेर, रेहान फिरोज अत्तार, अरहान अत्तार, अन्सफा रफिक अत्तार, नासीर अत्तार, समीरा सरदार मणेर, साजिदा मणेर, सुबहान मणेर, सानिया समीर शिकलगार, शाहीद शिकलगार, आयान गोलंदाज, मुस्तकिम समीर गोलंदाज, हुमेरा गोलंदाज, इरशत वाशिम शेख, रेहान अरिफ गोलंदाज, आलिया गोलंदाज, आरसलान यासीन मणेर, सुफियान यासीन मणेर, अयाज सलीम मुल्लाणी, सुफिया मुल्लाणी.