शहराच्या प्रवेशव्दारातील स्वागत कमान महापालिकेकडे हस्तांतरित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:18 AM2021-06-26T04:18:49+5:302021-06-26T04:18:49+5:30
या स्वागत कमानीवर असलेल्या जाहिरातीचे फलक पाहून कोल्हापुरातील विविध सामाजिक, तालीम संस्थांनी महापालिका प्रशासनाला निवेदने देऊन, तर काही नागरिकांनी ...
या स्वागत कमानीवर असलेल्या जाहिरातीचे फलक पाहून कोल्हापुरातील विविध सामाजिक, तालीम संस्थांनी महापालिका प्रशासनाला निवेदने देऊन, तर काही नागरिकांनी सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून या कमानीची माहिती घेतली. त्यानंतर आयुक्त आणि या कमानीवरील जाहिरातीचे ठेकेदार असलेल्या भारती एक्स्पो ॲड्स या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. या जाहिरात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरकरांच्या भावनांचा आदर करत संबंधित कमान महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास सकारात्मक दर्शविली. त्यानुसार त्यांनी या कमानीवरील जाहिरात फलक हटवून त्याठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहूनगरीत सहर्ष स्वागत असा फलक लावला असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. कोल्हापूरकरांच्या भावना आणि आमदार जाधव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही कमान हस्तांतरित करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असल्याचे भारती एक्स्पो ॲड्सचे संचालक मानस मंडलिक यांनी सांगितले. या कमानीबाबत महापालिका आणि संबंधित जाहिरात संस्थेमध्ये करार झाला होता. त्यानुसार कमानीची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी, वीज बिल, आदींची जबाबदारी या संस्थेवर होती. त्याबदल्यात त्यांना कमानीवर जाहिरात करण्याची परवानगी महापालिका प्रशासनाने दिली असल्याचे महापालिकेचे इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांनी सांगितले.
चौकट
सुशोभिकरणाबाबत आठ महिन्यांपूर्वी चर्चा
शहराची ओळख असलेल्या या स्वागत कमानीवरील जाहिरात कमी करणे. या कमानीचे ऐतिहासिक दगडी स्वरूपात सुशोभिकरणासह कमानीपासून महाराणी ताराराणी चौकापर्यंतच्या मार्गाच्या सौंदर्यकरणाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमवेत आठ महिन्यांपूर्वी चर्चा केली आहे. पालकमंत्री पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि मी कोल्हापूरला पुढे नेण्याच्या दृष्टीने कार्यरत असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
फोटो (२५०६२०२१-कोल-स्वागत कमान) : कोल्हापूर शहराच्या प्रवेशव्दारातील स्वागत कमानीवर शुक्रवारी भारती एक्स्पो ॲड्स या संस्थेने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शाहूनगरीत सहर्ष स्वागत’ असा फलक लावला.
===Photopath===
250621\25kol_5_25062021_5.jpg
===Caption===
फोटो (२५०६२०२१-कोल-स्वागत कमान) : कोल्हापूर शहराच्या प्रवेशव्दारातील स्वागत कमानीवर शुक्रवारी भारती एक्स्पो ॲडस या संस्थेने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शाहूनगरीत सहर्ष स्वागत’ असा फलक लावला.