कोल्हापुरात ‘सारथी’ला उपमुख्य केंद्राची मान्यता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:32+5:302021-07-09T04:16:32+5:30
सारथीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरीब मराठा समाजाची संख्या कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व सीमा भागात अधिक आहे. सारथीचा लाभ ...
सारथीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या गरीब मराठा समाजाची संख्या कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व सीमा भागात अधिक आहे. सारथीचा लाभ बहुसंख्य असणाऱ्या लोकांना मिळावा. यासाठी सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात स्थापन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या उपकेंद्रास उपमुख्य केंद्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, ॲड. गुलाबराव घोरपडे, इंद्रजित सावंत, शशिकांत पाटील, संजय काका जाधव, अवधूत पाटील, संदीप देसाई, प्रताप नाईक-वरुटे, महादेव पाटील, शाहीर दिलीप सावंत, संतोष घाटगे, संदीप जाधव-देशमुख, किरण पडवळ आदी उपस्थित होते.
चौकट
सारथीचे उपकेंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेतली. त्यातून या केंद्राला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज, शुक्रवारी शाहू छत्रपती यांचीही भेट घेऊन त्यांच्याशीही विचारविनिमय केला जाणार आहे. त्यातून सारथीचे काम गतिमान करण्यावर भर दिला जाणार आहे. तारादूतांच्या नेमणुकांसंबंधी व ‘बालभारती’च्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकासंबधीही बुधवारी (दि. १४) ला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेऊ, असेही अध्यक्ष निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फोटो : ०८०७२०२१-कोल-सकल मराठा
आेळी : कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी सकल मराठा समाजातर्फे सारथीचे अध्यक्ष अजितसिंह निंबाळकर यांची भेट घेऊन सारथीचे उपमुख्य केंद्रास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सारथीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, निबंधक अशोक पाटील, ॲड. गुलाबराव घोरपडे आदी उपस्थित होते.