वडगावात विक्रमी १०१ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:31 AM2021-07-07T04:31:01+5:302021-07-07T04:31:01+5:30

‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या ‘लोकमत’च्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला वडगाव विभागातही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यंदा कोरोनामुळे रक्ताचा मोठ्या ...

A record 101 people donated blood in Wadgaon | वडगावात विक्रमी १०१ जणांनी केले रक्तदान

वडगावात विक्रमी १०१ जणांनी केले रक्तदान

Next

‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या ‘लोकमत’च्या राज्यव्यापी महारक्तदान अभियानाला वडगाव विभागातही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

यंदा कोरोनामुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने या शिबिराला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून वडगावमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले.

प्रास्ताविक एच. आर. मॅनेजर गजानन कांबळे केले. जीवन धारा ब्लड बँकचे प्रकाश घुंगुरकर यांनी आभार मानले. या वेळी प्रोडक्शन मॅनेजर संतोष भोसले, सतीश सावळजकर, युनियन अध्यक्ष दिग्विजय शिंदे, उपाध्यक्ष सचिन खाडे, सचिव आदिल मुल्ला, रमेश पाटोळे, रामकृष्ण लोकरे, रणजित निकम, वडगाव शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन चव्हाण, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कपिल पाटील, राहुल माने, सूरज जमादार, बाजार समिती सभापती चेतन चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत १०२ रक्तपिशव्यांचे संकलन येथून झाले. या शिबिरास जीवन धारा ब्लड बँकचे सहकार्य लाभले.

‘लोकमत’चे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, वसुली प्रतिनिधी संतोष मिणचेकर, जाहिरात प्रतिनिधी संभाजी खवरे, विक्रांत चौव्हाण, आयुब मुल्ला, संतोष भोसले आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी गजानन कांबळे, संदीप घाडगे, सुहास जाधव यांचे सहकार्य लाभले.

फोटो कॅप्शन

पेठवडगाव येथील महात्मा फुले सूतगिरणीमध्ये लोकमत वृत्तपत्र समूह व महात्मा फुले कामगार संघ संयुक्त विद्यमाने माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी गजानन कांबळे, रमेश पाटोळे, लोकमतचे जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, वडगाव शहराध्यक्ष सचिन चव्हाण, रामकृष्ण लोकरे, युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष कपिल पाटील आदी उपस्थित होते.

अंबप येथील योगीराज कार्वेकर हे भारतीय सेनादलात तामिळनाडू येथे कर्तव्य बजावत आहे. सध्या सुटीला आले होते. त्यांना ‘लोकमत’च्या महारक्त दान शिबिराची माहिती समजताच सूतगिरणी येथे रक्तदान केले. त्यामुळे अनोखे कर्तव्य बजावले. त्यांनी आजपर्यंत १२ वेळा रक्तदान केले आहे.

Web Title: A record 101 people donated blood in Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.