विक्रमी ९०६ अर्ज

By admin | Published: June 9, 2015 12:52 AM2015-06-09T00:52:13+5:302015-06-09T00:58:48+5:30

बाजार समिती निवडणूक : उद्या छाननी; शनिवारपर्यंत माघारीची मुदत

Record 9 06 application | विक्रमी ९०६ अर्ज

विक्रमी ९०६ अर्ज

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी सोमवारी अखेरच्या दिवशी विविध गटांतून २०२ अर्ज दाखल झाले असून, अर्ज भरण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. आतापर्यंत तब्बल ९०६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये जिल्हा बॅँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड, कर्णसिंह गायकवाड, माजी सभापती दिनकर कोतेकर, आदी दिग्गजांचा समावेश आहे. उद्या, बुधवारी अर्जांची छाननी होणार आहे.
बाजार समितीच्या १९ जागांसाठी ९०६ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण गटातील दोन जागांसाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल २५८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ विकास सेवा संस्थांतील सर्वसाधारण गटातील सात जागांसाठी ३८४ अर्ज दाखल झाले आहेत. सर्वांत कमी भटक्या-विमुक्त जाती/जमाती गटातील एका जागेसाठी १५ अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारपर्यंत माघारीची मुदत आहे.
या दिग्गजांनी सोमवारी दाखल केले अर्ज - मानसिंगराव गायकवाड, कर्णसिंह गायकवाड, ‘बिद्री’चे संचालक पंडितराव केणे, माजी संचालक दत्तात्रय उगले, दिनकर कोतेकर, पंडितराव बोंद्रे, अनिल साळोखे, शिवाजी ढेंगे, प्रदीप पाटील, शाहू काटकर, पृथ्वीराज सरनोबत, उमरसाहेब पाटील, दत्ताजीराव वारके, कृष्णात चव्हाण, प्रा. जालंदर पाटील, केरबा चौगुले, सर्जेराव पाटील
(कळे), एच. आर. जाधव (बहिरेवाडी).
असे झालेत अर्ज दाखल, कंसात जागा : विकास संस्था : सर्वसाधारण गट ३८४ (७), महिला ३८ (२), इतर मागासवर्गीय- ७१ (१), भटक्या विमुक्त जाती/जमाती १५ (१). ग्रामपंचायत : सर्वसाधारण- २५८ (२), अनुसूचित जाती/जमाती ३३ (१), आर्थिक दुर्बल २२ (१). व्यापारी, अडते : ३० (२), हमाल-तोलाईदार - ३६ (१), कृषी प्रक्रिया संस्था १९ (१).


मागील निवडणुकीची पुनरावृत्ती?
मागील निवडणुकीत विभाजनाच्या राजकारणातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. विविध गटांतून एक हजारजण रिंगणात होते. यावेळी ९०६ अर्ज दाखल झाल्याने मागील निवडणुकीची पुनरावृत्ती होईल का? झाली तर कशी यंत्रणा लावायची, याची निवडणूक यंत्रणेकडून चाचपणी सुरू आहे.

दृष्टिक्षेपात बाजार समिती निवडणूक
पात्र विकास संस्था१,१४३ (मतदार - १३,८९६)
ग्रामपंचायती६०२
(मतदार- ५,२२८)
अडते-व्यापारी गट१,०६३
हमाल-तोलाईदार८९३
प्रक्रिया संस्था६३
संस्था (७८२)
जागा १९
सध्या कोणाची सत्ता प्रशासक
अर्जांची छाननी१० जून
माघारीची मुदत१३ जून
मतदान१२ जुलै.
मतमोजणी१४ जुलै

Web Title: Record 9 06 application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.