कोल्हापूरची वेदांगी सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणार, गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 16:54 IST2018-01-06T16:47:13+5:302018-01-06T16:54:33+5:30
मूळची हनुमाननगर पाचगांव (कोल्हापूर)ची व सध्या साऊथ वेस्ट इंग्लंड येथे शिक्षण घेणारी वेदांगी कुलकर्णी ही दि. १५ जून ते दि. २२ सप्टेंबर २०१८ दरम्यान १०० दिवसांत सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करून गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार आहे.

कोल्हापूरची वेदांगी सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणार, गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार
कोल्हापूर : मूळची हनुमाननगर पाचगांव (कोल्हापूर)ची व सध्या साऊथ वेस्ट इंग्लंड येथे शिक्षण घेणारी वेदांगी कुलकर्णी ही दि. १५ जून ते दि. २२ सप्टेंबर २०१८ दरम्यान १०० दिवसांत सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करून गिनीज बुक आॅफ वर्ल्डमध्ये आपला विक्रम नोंदविणार आहे.
‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड’च्या नियमानुसार ती जगातील सर्वांत जलद सायकलवरून पृथ्वी प्रदक्षिणा करणार आहे. सध्या ती इंग्लंड येथील बोर्नमथ विद्यापीठात स्पोर्टस् मॅनेजमेंटच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे.
अवघ्या १९ वर्षांची असलेली वेदांगी या उपक्रमात आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, कॅनडा, पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, रशिया, मंगोलिया,चीन आदी १५ देशांतून रोज ३२० किलोमीटर सायकल प्रवास एकटीने करणार आहे.
या उपक्रमातून तिला ‘साहसाची अमर्याद इच्छा ठेवा, विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लावा., सायकल प्रवास हा पर्यावरणपूरक आहे आदी संदेश तिला द्यायचा आहे. यापूर्वी तिने युरोप खंडातून सुमारे २० हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. कोल्हापूरच्या या कन्येच्या उपक्रमास सामाजिक व आर्थिक पाठबळ लाभावे, असे आवाहन वेदांगीचे वडील विवेक कुलकर्णी यांनी केले आहे.