फोटोग्राफरची शासनदरबारी नोंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:49+5:302021-05-29T04:18:49+5:30
जयसिंगपूर : फोटोग्राफरची शासनदरबारी नोंद करून कोरोनाच्या काळात आर्थिक मदत करावी, यासह मागण्यांचे निवेदन शिरोळ तालुका व छायाचित्रकार आणि ...
जयसिंगपूर : फोटोग्राफरची शासनदरबारी नोंद करून कोरोनाच्या काळात आर्थिक मदत करावी, यासह मागण्यांचे निवेदन शिरोळ तालुका व छायाचित्रकार आणि छायाचित्रण सहकारी संस्था जयसिंगपूर, इचलकरंजी छायाचित्रकार असोसिएशन व हुपरी परिसर छायाचित्रकार असोसिएशनच्यावतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे फोटोग्राफीचा व्यवसाय पूर्णत: बंद आहे. स्टुडिओमध्ये काम कमी असल्यामुळे भाडे, लाईट बिल व दैनंदिन खर्चदेखील निघत नाही. त्यामुळे आर्थिक व मानसिक संतुलन बिघडले आहे. शासनदरबारी फोटोग्राफरची नोंद नसल्यामुळे कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे फोटोग्राफरांची शासनदरबारी नोंद करून त्यांना मदत मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मंत्री यड्रावकर म्हणाले, फोटोग्राफर व त्यांच्या कुटुंबियांचा महात्मा फुले आरोग्य योजनेतून सर्व खर्च मोफत केला जाईल. शासनाकडे पैसा नसल्यामुळे कोणतीही आर्थिक मदत होणे अशक्य आहे. फोटोग्राफरची एक कलाकार म्हणून शासनदरबारी कशी नोंद करता येईल, यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
याप्रसंगी अशोक घोरपडे, सुरेश मेंगे, राजू सावंत, धनंजय पाटील, विलास माळी, सचिन मोरे, मोहन माणगांवे, शशिकांत चौगुले, आदिनाथ शिरगांवे, अभिजित गुरव, प्रसाद फुटाणे, सोहम रानभरे उपस्थित होते.
फोटो - २८०५२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे छायाचित्रकार असोसिएशनच्यावतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले.